Coronavirus cases in Maharashtra: 1082Mumbai: 642Pune: 130Navi Mumbai: 28Islampur Sangli: 26Kalyan-Dombivali: 25Ahmednagar: 25Thane: 24Nagpur: 19Pimpri Chinchwad: 17Aurangabad: 13Vasai-Virar: 10Latur: 8Buldhana: 7Satara: 6Panvel: 6Pune Gramin: 4Usmanabad: 4Yavatmal: 3Ratnagiri: 3Palghar: 3Mira Road-Bhaynder: 3Kolhapur: 2Jalgoan: 2Nashik: 2Ulhasnagar: 1Gondia: 1Washim: 1Amaravati: 1Hingoli: 1Jalna: 1Total Deaths: 64Total Discharged: 79BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

Mutual Fund भाग ५ : सुरक्षित गुंतवणुकीसाठी निवडा 'हे' डेट फंड

मागील लेखात आपण इक्विटी म्युच्युअल फंडांबद्दल माहिती घेतली. या लेखात म्युच्युअल फंडाचा डेट फंड (debt fund) हा प्रकार जाणून घेणार आहोत.

Mutual Fund भाग ५ :  सुरक्षित गुंतवणुकीसाठी निवडा 'हे' डेट फंड
SHARE

मागील लेखात आपण इक्विटी म्युच्युअल फंडांबद्दल माहिती घेतली. या लेखात म्युच्युअल फंडाचा डेट फंड (debt fund) हा प्रकार जाणून घेणार आहोत. डेट म्हणजे कर्ज. डेट फंडांची गुंतवणूक कर्जरोख्यांमध्ये केली जाते. केंद्र सरकार, राज्य सरकार, खासगी कंपन्या, सरकारी बँका, खासगी बँका आदींचे हे कर्जरोखे असतात. डेट फंडांचे काही प्रकार आहे. गुंतवणुकदारांची वेगवेगळी आर्थिक लक्ष्य लक्षात घेऊन वेगवेगळे डेट फंड तयार केले आहेत

डेट फंडाचे प्रकार

) लिक्विड फंड

फारच थोड्या कालावधीसाठी गुंतवणूक करण्याची इच्छा असलेल्यांसाठी लिक्विड फंड ही योजना चांगली आहे. लिक्विड फंडांमध्ये अगदी १ दिवसासाठीही गुंतवणूक करता येते. या योजनेत मनी मार्केट ट्रेझरी बिल्स, सर्टिफिकेट आॅफ डिपॉझिट, कमर्शिअल पेपर आणि सरकारी रोख्यात गुंतवणूक केली जाते. या फंडातून बाहेर पडताना कुठलाही एक्जिट लोड लागत नाही. लिक्विड फंडातून तात्काळ पैसे बँक खात्यात ट्रान्सफर होतात. हा एक अतिशय सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. मात्र, यामध्ये परतावा (रिटर्न) कमी मिळतो. या योजनेत ६ ते ७ टक्के वार्षिक दराने  परतावा मिळतो.

) गिल्ट फंड

गिल्ट फंड फक्त सरकारी कर्जरोख्यांमध्येच गुंतवणूक करतात. इतर कोणत्याही साधनांमध्ये या फंडांची गुंतवणूक नसते. गिल्ट फंड अल्प मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे असतात. अल्प मुदतीच्या गिल्ट फंडांमध्ये ७ वर्षांपर्यंत तर दीर्घ मुदतीच्या गिल्ट फंडात १० वर्ष गुंतवणूक करता येते. सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवणूक करणाऱ्यांसाठी गिल्ट फंड चांगले आहेत. व्याजदर कमी झाल्याच्या काळात दीर्घ मुदतीचे गिल्ट फंड चांगला पर्याय आहे. या फंडातील गुंतवणुकीवर कॅपिटल गेन टॅक्समध्ये सूट मिळते. 

३) इन्कम फंड

इन्कम फंडांची वेगवेगळ्या साधनांमध्ये गुंतवणूक असते. यामध्ये सरकारी रोखे, बाँड्स आणि डिंबेचर्सचा समावेश आहे. हे फंड मध्यम ते दीर्घ मुदतीच्या कालावधीचे असतात. २ ते ४ वर्षाच्या गुंतवणुकीसाठी इन्कम फंड उत्कृष्ठ पर्याय आहे. यातीला परतावे स्थिर आणि कमी जोखमीचे असतो. नियमित व स्थिर परतावे हवे असतील इन्कम योजनांमध्ये गुंतवणूक चांगली राहील.


) अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड

या फंडांमध्ये काही आठवते ३ महिन्यांपर्यंत गुंतवणूक करता येतेलिक्विड फंडांच्या तुलनेत अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडांमध्ये अधिक जोखीम असते. मात्र, इतर दीर्घ मुदतीच्या फंडांमपेक्षा या फंडात जोखीम कमी असते. एफडीपेक्षा जास्त परतावा हे फंड देतात.


५) शॉर्ट टर्म फंड्स 

शॉर्ट टर्म फंडात ३ महिने ते १ वर्षाच्या कालावधीपर्यंत गुंतवणूक केली जाते. या फंडाची सरकारी रोखे आणि कंपन्यांच्या कमर्शियल पेपरमध्ये गुंतवणूक केली जाते. व्याजदरातील बदलामुळे या फंडांमध्ये लिक्विड आणि अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडाच्या तुलनेत अधिक जोखीम असते. बाजारात जर व्याजदर वाढले तर हा फंड चांगला परतावा देऊन जातो.


६) लाँग टर्म फंड

लाँग टर्म फंडात १ ते ३ वर्ष मुदतीसाठी गुंतवणूक केली जाते. कंपन्याचे बाँड, बँक एफडी, कंपन्यांच्या एफडी, सरकारी मुदत ठेवी यांमध्ये या फंडाची गुंतवणूक असते. या फंडात गुंतवणूक करताना विशेष खबरदारी घ्यावी. कारण यातील गुंतवणूक जास्त मुदतीची असल्यामुळे त्या कालावधीचा विचार करूनच गुंतवणूक करावी. लवकर गुंतवणूक काढून घेतल्यास परतावा कमी मिळू शकतो किंवा तोटाही सहन करावा लागू शकतो.

) क्रेडिट ऑपर्च्युनिटी फंड

हे फंड इन्कम फंडांसारखेच असतात. मात्र, या फंडांमध्ये मोठी जोखीम असते. क्रेडिट ऑपर्च्युनिटी फंड टाॅप कंपन्यांच्या एेवजी क्रेडिट रेटिंग कमी असलेल्या कंपन्यांच्या बॉन्ड्स आणि डिबेंचर्समध्ये गुंतवणूक करतात. या फंडांमधून परतावा चांगला मिळतो. मात्र, या कंपन्या दिवाळखोरीत जाण्याचा धोका अधिक असतो. या फंडाची पूर्ण माहिती ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांनीच या फंडात गुंतवणूक करावी.

) मंथली इन्कम प्लान 

हे फंड गुंतवणूकदारांना दर महिन्याला नियमीत उत्पन्न देतात. या योजनेत चांगला परतावाही मिळतो. वरिष्ठ नागरिकांसाठी हे फंड एक चांगला पर्याय आहेत. यामध्ये मूळ रक्कम बुडण्याचा धोका नसतो. मात्र, किती उत्पन्न मिळेल याची खात्री देता येत नाही. कारण या फंडाच्या कामगिरीचा अंदाज लावणं कठीण आहे. या फंडाची ८५ ते ९० टक्के गुंतवणूक कर्ज रोख्यांमध्ये असते. तर राहिलेला हिस्सा इक्विटीमध्ये गुंतवला जातो. हे फंड डेट आणि इक्विटीचे मिश्रण आहे. मात्र, यामधील इक्विटीचा हिस्सा असून नसल्यासारखा आहे.

) फिक्स्ड मॅच्योरिटी प्लान 

या योजना बँकेतील मुदत ठेवींसारख्या असतात. हे फंड बँक मुदत ठेवींंच्या तुलनेत एक चांगला गुंतवणूकीचा पर्याय आहेत. फिक्स्ड मॅच्योरिटी प्लान फंडांमध्ये ९ ते १० टक्के परतावा मिळतो. या फंडातील गुंतवणुकीवर कर सवलतही मिळते. गुंतवणूकदारांना परतावा किती मिळेल याची माहिती नसतेया फंडातील पैसे रोख्यांमध्ये गुंतवले जातात. एका निश्चीत तारखेला परिपक्वता होते.हेही वाचा  -

Mutual Fund भाग १ : गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडच का? जाणून घेऊया म्युच्युअल फंडाविषयी

Mutual Fund भाग २ : 'हे' आहेत म्युच्युअल फंडाचे १० फायदे

Mutual Fund भाग ३ : 'हे' आहेत म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीचे बहुपर्याय

Mutual Fund भाग ४ : सर्वाधिक परतावा देणारे इक्विटी म्युच्युअल फंड
संबंधित विषय
संबंधित बातम्या