Mutual Fund भाग ४ : सर्वाधिक परतावा देणारे इक्विटी म्युच्युअल फंड

जे म्युच्युअल फंड (Mutual Fund ) गुंतवणुकदारांची गुंतवणूक कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवतात त्या म्युच्युअल फंडांना इक्विटी म्युच्युअल फंड (Equity Mutual Fund )म्हणतात. म्हणजे या म्युच्युअल फंडांचा पैसा शेअर बाजारात गुंतवला जातो.

SHARE

मागील लेखात आपण म्युच्युअल फंडाच्या ओपन-एंडेड योजना, क्लोज-एंडेड योजना आणि इंटरवल योजनांबद्दल जाणून घेतलं. या लेखात म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजना या प्रकाराची माहिती करून घेणार आहोत.

जे म्युच्युअल फंड (Mutual Fund ) गुंतवणुकदारांची गुंतवणूक कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवतात त्या म्युच्युअल फंडांना इक्विटी म्युच्युअल फंड (Equity Mutual Fund )म्हणतात. म्हणजे या म्युच्युअल फंडांचा पैसा शेअर बाजारात गुंतवला जातोगुंतवणुकदारांचा पैसा कोणत्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये लावायचा हे त्या फंडाचा मॅनेजर ठरवतो. या मॅनेजरला मदत करण्यासाठी एक रिसर्च टीम असते. या टीमची कंपन्यांच्या कामगिरीवर बारीक नजर असते. वेळोवेळी ह्या कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीचा ते आढावा घेत असतात. त्यानुसार त्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची की नाही हे ठरवले जाते. शेअर्समध्ये गुंतवणूक केली जात असल्यामुळे हे म्युच्युअल फंड जोखमीचे मानले जातात. मात्र, सर्वाधिक परतावा याच फंडांमधून मिळतो. त्यामुळे इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक एसआयपीद्वारे दीर्घकाळासाठी केलेली जास्त फायदेशीर ठरेलज्या गुंतवणुकदारांना थेट शेअर बाजारात गुंतवणूक करायची नसते ते गुंतवणूकदार इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करून शेअर बाजाराच्या वाढीचा फायदा घेऊ शकतात.


इक्विटी फंडांचे प्रकार 

) लार्ज कॅप इक्विटी फंड

देशातील शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या लार्ज कॅप म्हणजे आकाराने मोठ्या असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात मोठा बदल होत नाही. मार्केट कॅपिटल (बाजार भागभांडवल) मोठे असलेल्या या कंपन्यांवर शेअर बाजारातील चढ-उताराचा कमी प्रमाणात परिणाम होतो. ज्या गुंतवणुकदारांना जास्त जोखीम घ्यायची नसते ते लार्ज कॅप इक्विटी फंडात गुंतवणूक करू शकतात.

) मल्टी कॅप इक्विटी फंड

मल्टी कॅप इक्विटी फंड बहुतांशी लार्ज कॅप आणि मिड कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. या फंडांमधून जास्त परतावा मिळू शकतो.

) मिड कॅप इक्विटी फंड

शेअर बाजारातील ज्या कंपन्यांमध्ये लार्ज कॅप बनण्याची क्षमता असते त्या मिड कॅप म्हणजेच मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जातेम्हणजेच ज्यांची बॅलन्स शीट (ताळेबंद) चांगली आहे, नफा मोठा आणि त्यांच्याजवळ अधिक ऑर्डर आहेत अशा या कंपन्या असतात. मिड कॅप इक्विटी फंड हे थोड्या जोखमीसह गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आहेत.

) स्मॉल कॅप इक्विटी फंड 

शेअर बाजारातील स्मॉल कॅप म्हणजेच कमी भागभांडवल असणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये या फंडांची गुंतवणूक केली जाते. हे फंड अधिक जोखीम घेणाऱ्या अशा गुंतवणूकदारांसाठी आहेत ज्यांना १० वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे. आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेतल्याशिवाय स्मॉल कॅप इक्विटी फंडात गुंतवणूक करता कामा नये

मायक्रो कॅप इक्विटी फंड  

बाजार भागभांडवल खूपच कमी असणाऱ्या कंपन्यांमध्ये मायक्रो कॅप इक्विटी फंड गुंतवणूक करतात. या फंडांचा मॅनेजर आपल्या फंडाचा बहुतांशी हिस्सा चांगली कामगिरी करत असलेल्या लहान कंपन्यांमध्ये गुंतवतात.हेही वाचा  -

Mutual Fund भाग १ : गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडच का? जाणून घेऊया म्युच्युअल फंडाविषयी

Mutual Fund भाग २ : 'हे' आहेत म्युच्युअल फंडाचे १० फायदे

Mutual Fund भाग ३ : 'हे' आहेत म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीचे बहुपर्याय
संबंधित विषय
ताज्या बातम्या