Advertisement

दिव्यांग प्रवाशांसाठी एसटीच्या बस थांब्यावर व्हिलचेअर

दिव्यांग प्रवाशांसाठी प्रत्येक बस स्थानकावर व्हील चेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

दिव्यांग प्रवाशांसाठी एसटीच्या बस थांब्यावर व्हिलचेअर
SHARES

एसटीनं प्रवास करणाऱ्या दिव्यांग प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता दिव्यांग प्रवाशांसाठी प्रत्येक बस स्थानकावर व्हील चेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याबाबत एसटी महामंडळानं राज्यातील प्रत्येक विभागाला सूचना दिल्या आहेत

व्हील चेअरची सुविधा

राज्यातील प्रत्येक बस स्थानकावर, आगार मुख्यालयातील बस स्थानकावर व्हील चेअरची व्यवस्था केली जाणार आहेत. येत्या १५ दिवसांत हि सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रेल्वेनं आणि विमानानं प्रवास करणाऱ्या दिव्यांग प्रवाशांना व्हील चेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येतेमात्रएसटीच्या प्रवाशांना अशी कोणत्याही प्रकारची सुविधा दिली जात नव्हती.

प्रवाशांच्या तक्रारी

या प्रकरणी अनेक प्रवाशांनी तक्रार दाखल केली असून या तक्रांची दखल घेत दिव्यांग प्रवाशांना व्हील चेअरची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात आगारच्या मुख्यालयातील बस स्थानकं, तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्रातील बस स्थानकावर व्हील चेअर उपलब्ध करून दिली जाणार आहेत.



हेही वाचा -

आरेतील मेट्रो ३ प्रकल्पाच्या कारशेडला मुंबईकरांचा विरोध



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा