इंटरनेट फुकट देता, मग रेशनही द्या - उद्धव ठाकरे

इंटरनेट फुकट वाटता, मग रेशनही फुकट वाटा असा सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिलायन्स कंपनीला दिला अाहे.  रंगशारदा सभागृहात केबल मालकांच्या संघटनेने सभेचे आयोजन केले होते.  तुम्हाला न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मी तुम्हास बळ देण्यास आलो आहे, अशा शब्दात उद्धव यांनी केबल मालकांना दिलासा दिला.

उद्धवस्त होऊ देणार नाही

जिओ फायबरविरोधात मुंबईसह राज्यभरातील केबल मालक संघटना आक्रमक झाल्या आहे. शनिवारी केबल मालकांच्या सभेत बोलताना उद्धव म्हणाले की, जिओ फायबरमुळे केबल चालक अस्वस्थ झाले आहेत. ते धास्तावलेले आहेत. केबल चालकांनी कष्ट करून व्यवसाय उभे केले. ते असे उद्धवस्त होऊ देणार नाही.  प्रथम इंटरनेटसारख्या सेवा फुकट वाटायच्या. काही महिन्यांत प्रतिस्पर्धी नामोहरम होऊन संपले की नंतर अव्वाच्या सव्वा दर वाढवायचे. मोफत द्यायचे असेल ५० वर्षांचा करार करून मोफत सेवा वाटा. 

डिजिटलने पोट भरेल?

लोकांच्या ताटातली भाजी-भाकरी काढून घेतल्यावर डिजिटलने पोट भरेल का? त्यासाठी ताटात भाकरीचा लागते. व्यवसाय करण्यास आमचा विरोध नाही. आणखी १० जणांनी यावे. पण कोणाच्या पोटावर पाय आणू नये.  प्रत्येक गोष्ट आम्ही संघर्षातून मिळवणार आहोत. शिवसेना केबलचालकांच्या पाठीशी राहील, असा विश्वासही यावेळी उद्धव यांनी केबल मालकांना दिला. 


हेही वाचा - 

रक्षाबंधननिमित्त रविवारचा मेगाब्लॉक रद्द

भाजीवाल्याचं तर मुकबधीर प्रमिलाचं घराचं स्वप्न पूर्ण


पुढील बातमी
इतर बातम्या