Advertisement

रक्षाबंधननिमित्त रविवारचा मेगाब्लॉक रद्द


रक्षाबंधननिमित्त रविवारचा मेगाब्लॉक रद्द
SHARES

रूळ, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेसह अन्य दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वे प्रशासनाकडून दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. मात्र यंदा रक्षाबंधन रविवारी येत असल्याने मुंबईकरांच्या सुविधेसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने दिवसा ब्लॉक रद्द केला आहे. मात्र, वसई रोड-विरार स्थानकादरम्यान रात्रीचा ब्लॉक घेणार असल्याची घोषणा पश्चिम रेल्वेकडून करण्यात आली आहे.


रात्रकालीन ब्लॉक

पश्चिम रेल्वेने वसई रोड ते विरार स्टेशनदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शनिवार आणि रविवारी मध्यरात्री १२.३० ते ४.३० पर्यंत जंबोब्लॉक घेण्याची घोषणा केली आहे. या ब्लॉकच्या काळात धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवल्या जातील. त्यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसेल, असं पश्चिम रेल्वेने स्पष्ट केलं आहे. यासह मध्य आणि हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक नसल्याचं मध्य रेल्वेने जाहीर केलं आहे.

रक्षाबंधन सणानिमित्त रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक रद्द करत रविवारी नेहमीच्या वेळापत्रकानुसार लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रक्षबंधनच्या दिवशी प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार यात शंका नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा