पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य हैराण, नितीन गडकरी यांची कबुली

पेट्रोल-डिझेलची दरवाढ रोखणं आमच्या हातात नसल्याचं सांगत हात वर करणाऱ्या केंद्र सरकारला त्यांच्याच मंत्र्यांनी घरचा आहेर दिला आहे. मंगळवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल-डिझेलच्या सतत होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्य हैराण झाल्याची कबुली दिली.

काय म्हणाले गडकरी?

हे खरं आहे की, पेट्रोल आणि डिझेलचे दर चांगलेच वाढले आहेत. सातत्याने वाढणाऱ्या इंधनाच्या दरांमुळे सर्वसामान्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, असं गडकरी म्हणाले. परंतु पेट्रोल-डिझेचे दर येत्या काळात कमी होती की नाही? यावर मात्र त्यांनी काहीही भाष्य केलं नाही.

पेट्रोल नव्वदी पार

राज्यात पेट्रोलच्या दरांनी तर नव्वदी पार केली आहे. परभणी, नंदूरबार, नांदेडड, लातूर, जळगाव, बीड, औरंगाबाद आणि रत्नागिरी या शहरांमध्ये पेट्रोल प्रति लिटर ९० रुपयांहून जास्त किमतीला विकलं जात आहे. तर मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ८९.५४ रुपयांवर जाऊन पोहोचलं आहे.


हेही वाचा-

मुंबईत पेट्रोल नव्वदीच्या वेशीवर!

सोन्या-चांदीला झळाळी, किती रुपयांनी महागलं? वाचा...


पुढील बातमी
इतर बातम्या