Advertisement

सोन्या-चांदीला झळाळी, किती रुपयांनी महागलं? वाचा...


सोन्या-चांदीला झळाळी, किती रुपयांनी महागलं? वाचा...
SHARES

देशात पेट्रोलचे दर गगनाला भिडले असतानाच आता सोने आणि चांदीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. सोमवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात 70 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा दर प्रति तोळा 31,670 रुपये झाला. तर चांदीच्या दरात 180 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर 37,680 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.


म्हणून सोनं महागलं

सोने व्यापाऱ्यांच्या मते जागतिक बाजारातील परिणामांमुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापाराच्या तणावामुळे सोने-चांदीच्या आयातीवर प्रतिबंध लावण्यात आला होता. त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाली होती. मात्र आता अमेरिकेतील सोने बाजारात उलाढाल वाढल्याने सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.


रुपयाच्या घसरणीचा परिणाम

तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या मागणीचा परिणाम सोन्या-चांदीच्या मागणीवर झाला. त्यामुळेच सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण सुरूच आहे. त्याचा परिणाम म्हणून इंधनसह सोन्याच्या भावातही वाढ होत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा