Advertisement

मुंबईत पेट्रोल नव्वदीच्या वेशीवर!

मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत अनुक्रमे १० पैसे आणि ९ पैशांची वाढ झाली. यामुळे मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ८९.५४ रुपयांवर, तर डिझेल प्रति लिटर ७८.४२ रुपयांवर गेले आहेत.

मुंबईत पेट्रोल नव्वदीच्या वेशीवर!
SHARES

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमधील वाढ सातत्याने सुरूच आहे. त्यानुसार मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत अनुक्रमे १० पैसे आणि ९ पैशांची वाढ झाली. यामुळे मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ८९.५४ रुपयांवर, तर डिझेल प्रति लिटर ७८.४२ रुपयांवर गेले आहेत. इंधन उत्पादक कंपन्यांनी सलग वाढवलेल्या दरांमुळे मागील काही दिवसांमध्ये पेट्रोल १.२८ रुपयांनी महागलं आहे.


नव्वदी गाठणार

महाराष्ट्रातील औरंगाबाद, नागपूर आणि परभणी अशा शहरांमध्ये पेट्रोलने आधीच नव्वदी गाठली आहे. ही दरवाढ अशीच सुरू राहिल्यास मुंबईतही पेट्रोल लवकरच नव्वदी गाठेल, असं म्हटलं जात आहे. पूर्वी इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या भारतीय तेल उत्पादक कंपन्या दर १५ दिवसांनी इंधन दरांचा आढावा घेऊन इंधनाचे दर ठरवत असत. परंतु गेल्या वर्षी ही परंपरा मोडीत काढत इंधन कंपन्यांनी रोज सकाळी ६ वाजता इंधन दरांचा आढावा घेण्याची नवी प्रथा सुरू केली आहे. त्यानुसार रोज इंधनाच्या दरांवर परिणाम झालेला दिसतो.

कुठे गाठली नव्वदी?


औरंगाबाद
पेट्रोल: ९०. ५५ रु. प्रति लि.
डिझेल: ७९. ४५ रु. प्रति लि.

नागपूर
पेट्रोल: ९०. ०२ रु. प्रति लि.
डिझेल: ७८. ९५ रु. प्रति लि.

परभणी
पेट्रोल: ९१. ३२ रु. प्रति लि.
डिझेल: ७८. ९४ रु. प्रति लि.


मुंबईत सर्वाधिक दर

सद्यस्थितीत मुंबईतील पेट्रोल-डिझेलचे दर दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या तीन मेट्रो सिटीपेक्षा जास्त आहेत. मुंबईत पेट्रोल तसंच डिझेलवर सर्वाधिक मूल्यवर्धित कर आकारण्यात येत असल्याने इथं इंधनाचे दर अधिक आहेत.


दरवाढीचं कारण काय?

इंधनाचे दर सातत्याने वाढण्यामागचं कारण डाॅलरच्या तुलनेत रुपयांत होणारी घसरण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचं मूल्य घसरल्याने तेल उत्पादक कंपन्यांना डाॅलरच्या तुलनेत अधिक रुपये मोजून कच्च तेल विकत घ्यावं लागत आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत इंधनाच्या किमतीवर पडत आहे.



हेही वाचा-

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा