माझ्यापेक्षा पत्नीला जास्त पगार - देवेंद्र फडणवीस

माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला जास्त पगार आहे. त्यामुळे तो माझ्या लक्षात राहतो असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. आपल्या अर्थसंकल्प सोप्या भाषेत पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. अर्थसंकल्पात क्लिष्ट वाटणार्‍या संज्ञा अतिशय सोप्या आहेत, असे सांगताना त्यांनी आपल्या घराचे बजेट आणि राज्याचे बजेट यामध्ये जास्त फरक नसल्याचे सांगितलं.

हेही वाचाः- ​ जीडीपीत महाराष्ट्राची ५ स्थानावर घसरण​​​

आपल्याला मिळणारा पगार, पत्नीला मिळणारा पगार ही आपली आवक आहे. तर घरचा खर्च जावक आहे. त्याच्याकरिता जे काही वित्तीय व्यवस्थापन आपण करतो आणि तसेच राज्याचे वित्तीय व्यवस्थापन असते. यामध्ये जास्त फरक नाही. फक्त राज्यात अधिक व्यापकता असते. राज्याला जास्त मोठे काम करावे लागते. आपण बजेट नीट समजून घेतले तर भीती निघून जाईल, असे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला जास्त पगार आहे म्हणून मला तो लक्षात राहतो असे मिश्किल वक्तव्य केले. अर्थसंकल्प अनेकांना क्लिष्ट विषय वाटतो. अर्थसंकल्प ज्यावेळी सदस्यांना मिळतो, त्यावेळी बॅग भरुन त्यांना पुस्तकं मिळतात. त्या पुस्तकांचे नेमकं काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. 

हेही वाचाः- ​नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल अरबी समुद्राच्या तळातून शोधले​​​

अनेक सदस्य पुस्तकं तिथेच ठेवतात आणि बॅग घेऊन निघून जातात. मला थोडा रस असल्याने मी त्या पुस्तकांचा अभ्यास केला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हे पुस्तक सामान्य माणसाला बजेटमधील प्रत्येक गोष्ट सहजपणे कळली पाहिजे यासाठी हे आहे. आपण असे पुस्तक लिहिले पाहिजे जे जास्तीत-जास्त ४४ मिनिटात वाचता आले पाहिजे अशी अट मीच ठेवली होती, अशी माहिती फडणवीसांनी यावेळी दिली. बजेटसंबंधी बोलताना त्यांनी म्हटलं की, जीडीपीचा नेमका अर्थ ५0 टक्क्यांहून जास्त लोक सांगू शकत नाही. पण कार्यपद्धती आणि रचना कळली तर केंद्राचा किंवा राज्याचा असो अर्थसंकल्प समजू शकतो. त्याचे विेषण करता येऊ शकते. हिंदी आणि इंग्रजीतही हे पुस्तक येणार असल्याची माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या