Advertisement

जीडीपीत महाराष्ट्राची ५ स्थानावर घसरण

आर्थिक पाहणी अहवालात दरडोई उत्पन्नामध्ये (GDP) इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची पिछेहाट झाल्याचं पुढं आलं आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.

जीडीपीत महाराष्ट्राची ५ स्थानावर घसरण
SHARES

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (state finance minister ajit pawar) यांनी गुरूवारी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर केला. आर्थिक पाहणी अहवालात दरडोई उत्पन्नामध्ये (GDP) इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची पिछेहाट झाल्याचं पुढं आलं आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.

हेही वाचा- ‘कॅग’वरून लक्ष वळवण्यासाठीच CAA चा मुद्दा, नवाब मलिक यांचा भाजपवर आरोप

आर्थिक पाहणी अहवालानुसार (economic survey of maharashtra) राज्यावर कर्जाचा बोजा वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. सद्यस्थितीत राज्यावर ७१ हजार ६४२ कोटी रुपयांचं कर्ज असून राज्याची महसुली तूट २० हजार २९३ कोटी रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे शुक्रवारी अर्थसंकल्प सादर करताना सर्व विभागाला पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही देणारे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे (maha vikas aghdi) अर्थमंत्री अजित पवार यांचा कस लागणार आहे. 

महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न १, ९१, ७३६ रुपये आहे. देशात दरडोई (GDP) उत्पन्नात हरियाणा अव्वल असून तेथील उत्पन्न २,२६,६४४ रुपये आहे. त्याखालोखाल कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू ही राज्ये असून महाराष्ट्र पाचव्या (5th rank) स्थानी आहे. 

सातव्या वेतन आयोगामुळे तिजोरीवरील भार २४ हजार कोटी रुपयांनी वाढला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी (farmer loan waiver scheme) देताना सरकारची दमछाक होऊ शकते. यंदा अर्थ खात्याकडून २४ हजार ७१९ कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या.   

हेही वाचा- होळी खेळा पण.., करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

गेल्या वर्षी औद्योगिक क्षेत्राची वाढ ७.१ टक्के होती. यावर्षी हीच वाढ ५.५ टक्के आहे. बांधकाम क्षेत्राची वाढ ५.६ टक्के होती. यावर्षी हीच वाढ ५.१ टक्के आहे. उसाच्या उत्पन्नात यंदा ३६ टक्के घट अपेक्षित आहे. गतवर्षीच्या तुलनेत तृणधान्ये ४३ आणि कडधान्ये २३ टक्केने वाढ होईल. तेलबियांच्या उत्पादनात मात्र २४ टक्के घट अपेक्षित आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा