नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल अरबी समुद्राच्या तळातून शोधले

नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे पिस्तूल सीबीआयने शोधून काढलं

नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल अरबी समुद्राच्या तळातून शोधले
SHARES

अंधर्शद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयला मोठं यश मिळालं आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल सीबीआयच्या हाती लागलं असल्याची शक्यता आहे. अरबी समुद्राच्या तळातून हे पिस्तूल सीबीआयने शोधून काढलं आहे. या पिस्तुलाची सध्या पाहणी केली जात आहे. यानंतरच आरोपींनी हे पिस्तूल वापरलं होतं की नाही हे स्पष्ट होईल. नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे पिस्तूल सीबीआयने शोधून काढलं. तपासाशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकार्‍यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यात २0१३ मध्ये नरेंद्र दाभोलकर यांची दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी गोळी घालून हत्या केली होती.

हेही वाचाः-​मुंबई पोलिसांच्या शरीरावर बसवणार कॅमेरे​​​

हे पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरले होते का? याचा तपास सध्या सीबीआय करत असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. सीबीआयने २0१९ रोजी पुणे कोर्टात ठाण्यामधील खारेगाव खाडीत हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घ्यायचा असल्याचे सांगितले होते. आरोपींनी हत्येनंतर खारेगाव खाडीजवळ हे पिस्तूल फेकून दिले होते. तेथूनच हे पिस्तूल शोधून काढण्यात आलं आहे. ह्लअनेक दिवस शोध घेतल्यानंतर आम्हाला पिस्तूल सापडलं आहे. शवविच्छेदन अहवालात असलेल्या माहितीच्या आधारे बॅलिस्टिक तज्ञ पिस्तुलाची पाहणी करणार आहेत,ह्व अशी माहिती एका अधिका?्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली आहे.पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी मदत करणा?्या दुबई स्थित एन्विटेक मरीन कन्सल्टंटने नॉर्वेमधून यंत्रसामग्री मागवली होती. पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी तज्ञांकडून लोहचुंबकाचा वापर करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत खारेगाव येथील सर्व परिसराची छाननी करण्यात आली.

हेही वाचाः- कोस्टल रोडने घेतले दोन पोलिसांचे बळी

या ऑपरेशनसाठी सीबीआयकडून पूर्ण तयारी करण्यात आली होती. राज्य सरकारकडून परवानगी घेण्यापासून ते पर्यावरण खात्याकडून मंजुरीपासून सगळी तयारी त्यांनी केली होती. नॉर्वेमधून यंत्रसामग्री आणण्यासाठी ९५ लाखांचा सीमाशुल्क त्यांना माफ करण्यात आला. पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी आखण्यात आलेल्या या मोहिमेसाठी एकूण ७.५ कोटींचा खर्च आला. या केसचा निकाल लागावा यासाठी सीबीआय सर्वोतपरी प्रयत्न करत असल्याचं अधिकार्‍याने सांगितलं आहे. मात्र, पिस्तुलाची पाहणी केल्यानंतरच हे पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येत वापरण्यात आलं होतं की नव्हतं हे स्पष्ट होईल.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा