मुंबई पोलिसांच्या शरीरावर बसवणार कॅमेरे

नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस ( mumbai police) सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आता मुंबई पोलिसांच्या शरीरावर कॅमेरे (Camera on the body) बसविण्यात येणार आहेत.

मुंबई पोलिसांच्या शरीरावर बसवणार कॅमेरे
SHARES

नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस ( mumbai police) सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आता मुंबई पोलिसांच्या शरीरावर कॅमेरे (Camera on the body) बसविण्यात येणार आहेत. बाॅडी वाॅर्न कॅमेरा (Body Worn Camera) असं या कॅमेऱ्याचं नाव आहे. हे कॅमेरे ५०० पोलिसांच्या शरीरावर बसवले जाणार आहेत. मुंबईत आंदोलन, मोर्चा, मिरवणुका आणि सभांच्या वेळी तेथे बंदोबस्तावेळी असलेल्या पोलिसांच्या शरीरावर हे बॉडी वॉर्न कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याशिवाय गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या शरीरावर हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत

पोलिसांच्या गाडीसमोरील काचेवर आणि गाडीवरही कॅमेरे (camera) बसविण्यात येणार आहेत. कॅमेऱ्यांमुळे गुन्हे रोखण्याबरोबरच गुन्हेगारांना पकडताही येणार आहे. पोलिसांच्या शरीरावर बसवण्यात येणाऱ्या या कॅमेऱ्यात वायफाय (WiFi), जीपीएस (gps), ब्लूटुथ (bluetooth) सारख्या सुविधा असतील आणि हे कॅमेरे कंट्रोल रुमशी कनेक्ट असतील. तसंच  या कॅमेऱ्याने रात्रीही रेकॉर्डिंग केली जाणार आहे. पोलिसांवर जमावकडून होणारा हल्ला आणि वाहतुकीचं उल्लंघन आदी प्रसंगातही या कॅमेऱ्यांचा पोलिसांना फायदा होणार आहे. 

पोलिसांच्या १०० गाड्यांच्या समोरील काचांवर डॅश कॅमेरे (camera) लावण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यातून पळून जाणाऱ्या सर्व आरोपींची रेकॉर्डिंग केली जाणार आहे. पोलिसांच्या व्हॅन अथवा जीपवर हल्ला केल्यास त्याचंही रेकॉर्डिंग होणार आहे. या शिवाय पोलीस दल आणखी १०० कॅमेरे खरेदी करणार आहे. हे कॅमेरे गाड्यांच्या टपावर लावण्यात येणार आहेत. हे कॅमेरे सुद्धा कंट्रोल रुमशी कनेक्ट राहणार आहेत. 



हेही वाचा -

नरेंद्र मेहतांना न्यायालयाकडून दिलासा, २० मार्चपर्यंत अटक नाही

जेट एअरवेजचे माजी चेअरमन नरेश गोयल यांच्या घरावर ईडीचा छापा




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा