जेट एअरवेजचे माजी चेअरमन नरेश गोयल यांच्या घरावर ईडीचा छापा

मनी लौंड्रिंगच्या आरोपाखालीगोयल यांच्या घरावर छापा टाकून सर्च ऑपरेशन सुरू

जेट एअरवेजचे माजी चेअरमन  नरेश गोयल यांच्या घरावर ईडीचा छापा
SHARES

अंमलबजावणी संचालनालय (ईडी )कडून मनी लौंड्रिंग प्रकरणात जेट एअरवेजचे माजी चेअरमन नरेश गोयल यांच्याघरावर ईडीने बुधवारी रात्री उशिरा छापा टाकला. सहाना ग्रुपचे मालक सुधाकर शेट्टी यांच्यात चौकशीनंतर ईडीने आता आपला मोर्चा नरेश गोयल याच्याकडे वळवला असून त्यांच्यावर मनी लौंड्रिंगच्या आरोपाखालीगोयल यांच्या घरावर छापा टाकून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

हेही वाचाः- लवकरच येणार वॉर्निश केलेल्या १०० रुपयांच्या नोटा

ईडीने नरेश गोयल यांच्या मुंबईतल्या खबाला मिल येथील  घरावर ईडीने छापा टाकला. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे. त्याआधी बुधवारी सकाळी ईडीने नरेश गोयल यांना समन्स पाठवले होते. कर वाचवण्यासाठी नरेश गोयल यांनी देशातील आणि पदेशातील कंपन्यांमध्ये देवाण-घेवाण केली होती. तसेच पैसा देशाबाहेर पाठवल्याचा आरोप आहे. २०१४ मध्ये कऱण्यात आलेल्या या गुंतणुकीदरम्यान एफडीआयच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं तपास यंत्रणांकडून सांगण्यात आलं होतं.अजूनही गोयल यांच्या घराची ईडीचे अधिकारी झडती घेत आहेत.दरम्यान, छापा टाकण्यापूर्वी, फेमा अंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने जेट अधिकाऱ्यांच्या जागेसह दिल्ली आणि मुंबईतील १२ ठिकाणी शोध घेतला.

१९९२ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या जेट एअरवेजच्या बोर्डावरुन नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीने गेल्या वर्षी मार्च महिन्यात राजीनामा दिला होता. नरेश गोयल चेअरमन पदावरुनही पायउतार झाले होते. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या चौकशी अहवालात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार असल्याचे आढळले होते. १७ एप्रिल रोजी जेट एअरवेज पूर्णपणे ठप्प पडली. यापूर्वी गोयल आणि त्यांची पत्नी अनिता यांच्यावर नुकतीच एका ट्रॅव्हल कंपनीत ४६ कोटी रुपयांच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट भागात कार्यालय असलेल्या अकबर ट्रॅव्हल्स ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य वित्त अधिकारी राजेंद्रन नेरुपरंबिल यांनी तक्रार दिली होती.

हेही वाचाः- Exclusive सराईत गुन्हेगारांना 'एमपीडीएचा' धाक - पोलिस आयुक्तांचे आदेश

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा