३१ आॅगस्टपर्यंत काँग्रेसच्या उत्तराची वाट बघू- प्रकाश आंबेडकर

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला वंचित बहुजन आघाडी (VBA)कडून १४४ जागांची आॅफर देण्यात आली आहे. ही आॅफर काँग्रेस (Congress) स्वीकारतं की नाही, याची आम्ही ३१ आॅगस्टपर्यंत वाट बघू, त्यानंतरच पुढील निर्णय जाहीर करू. तसंच एमआयएम (MIM)सोबतही आमची जागावाटपाची बोलणी सुरू आहे. एमआयएमसोबत आघाडी करूनच आम्ही निवडणूक लढू, असं वक्तव्य वंबआचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं.

ओबीसीकरीता वेगळी तरतूद

मुंबईत मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी (OBC) समुदायाला पदोन्नतीत देखील आरक्षण मिळायला हवं, अशी भूमिका मांडली. सोबतच वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास एससी आणि एसटीनुसार ओबीसी वर्गाकरीता शिक्षणासाठी वेगळी तरतूद करण्यात येईल, असं आंबेडकर म्हणाले.

काँग्रेस, राष्ट्रवादीला फटका

वंबआ आणि एमआयएमने लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती. या आघाडीचा फटका प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसला होता. या दोन्ही पक्षाला किमान ९ ते १० जागा या आघाडीमुळे गमवाव्या लागल्या होत्या.


हेही वाचा-

वंचित, एमआएमच्या जागा वाटपावर बैठक

वंचित पुढे काँग्रेसच वंचित? ४० जागांचा प्रस्ताव देऊन केली थट्टा


पुढील बातमी
इतर बातम्या