२०१४च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या बहुमताप्रमाणं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा महायुतीला बहुमत मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईसह देशभरात महायुतीला जास्त मत मिळाल्यामुळं देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. दरम्यान, देशात लोकसभा निवडणुक महायुती विजयी झाल्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जगभरातून कौतुक केलं जातं आहे.
इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. माझ्या मित्रा नरेंद्र मोदी लोकसभा निवडणूक जिकल्याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
जापानचे पंतप्रधान शिंजो आबे यांंनी मोदी यांना फोन करत भाजपा लोकसभा निवडणूक विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. त्याशिवाय, चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग यांनी नरेंद्र मोदी यांना बहुमत मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी नरेंद्र मोदी यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रीलंकाचे प्रधानमंत्री रानिल विक्रमसिंघे यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घानी यांनी ट्विट करत मोदी यांना शुभेच्या दिल्या आहेत.
अमेरिकेचे राजदूत केन जस्टर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्या दिल्या आहेत. येणाऱ्या काळात अमेरिका भारतासोबत काम करण्यासाठी तत्पर आहे.
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्या दिल्या आहेत. तसंच, पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी सुद्धा मोदींना शुभेच्या दिल्या आहेत.
अबू धाबीचे क्राउन प्रिंस शेख मोहम्मद बिन जायद अल नहयान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा -
मनसेचे उमेदवार असते तर चित्र वेगळं असतं - शरद पवार