आता हेलिकाॅप्टरने जा 'जीवदानी'च्या दर्शनाला, भाविकांसाठी खास सुविधा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

विरारच्या जीवदानी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांना आता हेलिकॉप्टरने जाता येणार आहे. त्याचं प्रात्यक्षिक नुकतंच पार पडलं. पुण्यातील वरद एव्हीएशन या कंपनीने वसई-विरार परिसरातील नागरिकांसाठी प्रथमच हेलिकॉप्टर राईड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी हेलिपॅड जीवदानी मंदिराच्या मैदानात तयार करण्यात आले आहे. एक ते दीड महिन्यात ही सेवा भाविकांसाठी सुरू केली जाणार आहे.

हेलिकॅाप्टरमधून चार पर्यटक एका वेळी या राइडचा आनंद घेऊ शकणार आहेत. पर्यटकांना या राइडच्या माध्यमातून काही मिनिटांत विरारच्या जीवदानी मातेचे  हवाई दर्शन घेता येणार असून पालघर जिल्हातील विविध पर्यटन स्थळांचे दर्शन या हवाई राईडमध्ये जनतेला मिळणार आहे. शनिवार आणि रविवार ही सेवा सुरू असेल.

विरारचे जीवदानी मंदिर हे विरारमधील सुप्रसिद्ध मंदिर असून महाराष्ट्रातून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. नुकतेच या मंदिरात फनीक्युलर ट्रेनची सुविधा सुरू केली आहे. त्यानंतर आता हेलिकॉप्टरची पण सेवा सुरू केली जाणार आहे. हेलिकॉप्टर सेवेचा दर साधारणपणे ३५०० ते ५००० रुपयाच्या दरम्यान असतील अशी माहिती जीवदानी मंदिराचे संचालक प्रदीप तेंडुलकर यांनी दिली आहे.  ही सफर यशस्वी झाल्यास या ठिकाणाहून शिर्डी, वणी, मुंबई आणि इतर ठिकाणची हवाई सफरही करता येणार आहे.



हेही वाचा -

मुंबईत मार्चमध्ये कोरोना रुग्ण संख्येत ४७५ टक्के वाढ

मुंबईत कोरोनाचा उद्रेक, गुरूवारी तब्बल 'इतके' नवे रुग्ण

पुढील बातमी
इतर बातम्या