हिंदु-मुस्लिम ऐक्य जपणारे शिर्डीतील साई संस्थान

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

शिर्डीच्या साई मंदिरामध्ये सर्वधर्मीय दर्शनाला येतात. या मंदिरात हिंदु-मुस्लिमांचे ऐक्य देखील जपलं जातं. विशेष म्हणजे गेल्या ६० वर्षांहून अधिक काळापासुन शिर्डीत ही परंपरा सुरू आहे. साईबाबांनी सर्व धर्म समभावची शिकवण देत, अवघ्या विश्वाला सबका मालिक एकचा संदेश दिला आहे.

शिर्डीत साईबाबा वास्तव्याला असताना पडक्या मशिदीत त्यांनी धुनी प्रज्वलीत केल्या होत्या. साईबाबा असताना या मशिदीला द्वारकामाई म्हटलं जात होतं. आजही द्वारकामाईवर रामनवमीच्या दिवशी भगवा आणि हिरवा रंग असलेला हिंदू-मुस्लीमांच्या एकतेचा ध्वज फडकवण्याची प्रथा आहे.

परंपरेनं साईमंदिरात दररोज सकाळी ९:४५ वाजता साईच्या समाधी समोर हिंदू आणि मुस्लीम मानकरी एकत्र येऊन समाधीवर चादर चढवून फुले वाहत साई दर्शन घेतात. साई समाधीच्या उत्तरेकडील बाजुनं मुस्लीम तर दक्षिणेकडील बाजुनं हिंदू मानकरी उभे राहुन फुले वाहत प्रार्थना करण्याची परंपरा आहे.

शिर्डीत द्वारकामाई अर्थात मजिदीवरही लाऊड स्पीकर असून त्यावरुन साई मंदिरात होणा-या चार मोठ्या आणि एक छोटी अशा पाच आरत्याचं प्रसारण केल जातं.

दरम्यान, शिर्डीच्या मंदिरावर पहाटे आणि रात्री ध्वनिवर्धक लागणार नाहीत. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा खंडित करण्यात आली आहे. शिर्डी पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील सर्व धार्मिक स्थळांना या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानुसार साई मंदिरासह सर्वच धार्मिक स्थळांनी पहाटे आणि रात्री ध्वनिवर्धक न लावण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे.

शिर्डी हे सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. इथल्या आरत्यांच्या स्पीकरवर कोणी कधीही हरकत घेतली नव्हती. आता मात्र महत्वाच्या आरत्यांच्यावेळी स्पीकर बंद राहणार असल्याने त्या मंदिर परिसरात आणि शहरातही ऐकता येणार नाहीत. दुपारची आरती आणि सूर्यास्ताच्या वेळची धुपारती यावेळी मात्र स्पीकर सुरू राहणार आहेत.


हेही वाचा

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात शेजारती, काकड आरती लाऊडस्पीकरविना

नवी मुंबईत उभारणार तिरुपतीचे भव्य मंदिर!

पुढील बातमी
इतर बातम्या