Advertisement

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात शेजारती, काकड आरती लाऊडस्पीकरविना

राज ठाकरे यांच्या वक्तव्याची दखल घेत साईबाबा संस्थानानं मोठा निर्णय घेतला आहे. इतिहासात असं प्रथमच घडलं आहे.

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात शेजारती, काकड आरती लाऊडस्पीकरविना
SHARES

भोंग्यांवरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. भोंगे धार्मिक नाही तर सामाजिक विषय असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

“सगळ्या धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरलेच पाहिजे. ते भोंगे मंदिरांवरील असले तरी उतरवलेच गेले पाहिजेत,” असं मत राज ठाकरे यांनी रविवारच्या सभेत व्यक्त केलं होतं.

राज ठाकरे यांच्या वक्तव्याची दखल घेत साईबाबा संस्थानानं मोठा निर्णय घेतला आहे. शिर्डीच्या साई मंदिरातही (Shirdi Sai Mandir) पहाटेची काकड आरती आणि रात्रीची शेजारती लाऊडस्पिकरविना झाली आहे.

इतिहासात प्रथमच श्री साईबाबा मंदिरातील रात्रीची आणि सकाळची आरती लाऊडस्पिकर विनाचं झाली आहे. याच बरोबरीने शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत सर्व मशिदीत नमाज झाली परंतु अजानसाठी कोणीही स्पिकरचा वापर केला गेला नाही. शिर्डीत एकूण सहा मशिदी असून ४ मे च्या सकाळची अजाण करण्यात आली. मात्र त्यासाठी ध्वनीक्षेपकांचा वापर गेला नाही.

'या' वेळेत लाऊडस्पिकर बंद

  • साईमंदिरातील दिनक्रम पहाटे ५ वाजता भुपाळी रेकॉर्डनं सुरू होईल.
  • लाऊड स्पिकर बंद - पहाटे ५:१५ वाजता
  • काकड आरती- लाऊड स्पिकर बंद
  • सकाळी ५:५० वाजता श्रींचे मंगलस्‍नान, त्‍यानंतर शिर्डी माझे पंढरपूर या आरतीसाठी लाऊडस्पिकर बंद
  • सकाळी ६:२५ वाजता दर्शनास प्रारंभ लाऊड स्पिकर सुरू.
  • दुपारी १२ वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती लाऊड स्पिकर सुरू
  • सूर्यास्‍ताच्या वेळी श्रींची धुपारती लाऊड स्पिकर सुरू
  • रात्री १० वाजता श्रींची शेजारती लाऊड स्पिकर बंद

३ मेला शिर्डी पोलिसांनी साईबाबा संस्थानला पत्राद्वारे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत लाऊड स्पिकर वापरण्यास परवानगी नसल्याचं सांगितलं. तसंच या वेळेत साईमंदीरावरील लाऊड स्पिकर वापरु नये, असे आदेश दिल्यानं ३ मे ला रात्री साईमंदिरात झालेला शेजआरती आणि ४ मेला पहाटेच्या काकड आरती स्पिकरवरून प्रसारीत करण्यात आली नाही.

भोंगावाद आणि त्याच बरोबरीनं सुप्रीम कोर्टाचे निर्देश यामुळे साईबाबा प्रतिस्थानानं हा निर्णय घेतला आहे. साईबाबा संस्थानाने सामंजस्याची (Shirdi News) भूमिका घेत इतर देवस्थान आणि प्रार्थनास्थळांपुढे आदर्श ठेवला आहे.



हेही वाचा

परप्रांतीय म्हणतात, मराठी माणूस दिलदार, सर्वेतून उघड

नवी मुंबईत उभारणार तिरुपतीचे भव्य मंदिर!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा