एक धाव सुदृढ आरोग्यासाठी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

निरोगी जगण्यासाठी थोडा व्यायाम गरजेचा आहे. व्यायाम म्हणून थोडं धावलं, थोडं चाललं तर अधिक सुदृढ जगता येईल. हाच विचार करून मुंबईत 'रन टू गीव' या ५ किलोमीटर मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे.

सुदृढ आरोग्यासाठी

मुंबई विभागासाठी दी वेस्टिन मुंबई गार्डन सिटी या हॉटेलनं मॅरेथॉनचं आयोजन केलं आहे. या माध्यमातून प्रकृतीची योग्य काळजी घेऊन योग्य नियम पाळून मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी सहभागींना प्रेरणा दिली जाते. ५ किलोमीटरची ही मॅरेशॉन आहे. गोरेगावमधल्या दी वेस्टिन मुंबई गार्डन सिटी हॉटेलपासून या मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. या मॅरेथॉनमध्ये जे डब्ल्यू मॅरीयेट जुहू, जे डब्ल्यू मॅरीयेट सहार, कोर्टयार्ड बाय मॅरीयेट, फोर पॉईंट्स बाय शेरीटन वाशी आणि सेट रेजस जे डब्ल्यू मॅरीयेटच्या या हॉटेलचा समावेश आहे. हr सहा हॉटेल्स मॅरेट इंटरनॅशनलचा एक भाग आहेत.

आरोग्यासोबत समाजसेवा

मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला ५०० रुपये भरून नोंदणी करावी लागेल. सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट, पाण्याची बाटली आणि सकाळचा नाष्टा असं पॅकेज देण्यात येईल. स्पर्धकांकडून जमवलेले हे पैसे चेन्नईतल्या एका संस्थेला देण्यात येतील. त्यामुळे तुम्ही जर या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असाल तर तुमचा पैसा एका चांगल्याच कामासाठी वापरला जात आहे याचं समाधान मिळवता येईल. तुम्हाला या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर ९००४६६१०४८ या नंबरवर संपर्क करा.

कधी : रविवार, ३० सप्टेंबर २०१८

अंतर : ५ किलोमीटर

वेळ : सकाळी ६ वाजता

नोंदणी फी : ५०० रुपये (एकासाठी)


हेही वाचा -

५० लाख जिंकायचेत? मग 'या' गेमिंग स्पर्धेत सहभागी व्हाच!

'इथं' भरणार पहिलावहिला 'घुबड महोत्सव'


पुढील बातमी
इतर बातम्या