मुंबईच्या डबेवाल्यांना मिळणार किराणा सामान, अत्यावश्यक वस्तू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

कोरोनामुळे मागील ४ महिन्यांपासून मुंबईत राज्यात लाॅकडाऊन आहे. यामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. याचा मोठा आर्थिक फटका मुंबईतील डबेवाल्यांना बसला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने मुंबईतील ४०० डबेवाल्यांना किराणा सामान, अत्यावश्यक वस्तू आणि महत्त्वाच्या सेवा सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, डबेवाल्यांना थोडीशी मदत व्हावी यासाठी त्यांना घरासाठी लागणारे किराणा सामान, काही महत्त्वाच्या सेवा-सुविधा आणि अत्यावश्यक वस्तू देण्यात येणार आहेत.

लॉकडाऊनच्या काळात डबेवाल्यांची उपासमार सुरू आहे. त्यांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक औषधे पुरविणे आवश्यक आहे. जोपर्यंत मुंबईतील लोकलसेवा व उद्योगधंदे आणि कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू होत नाहीत तोपर्यंत डबेवाल्यांचे हाल संपणार नाहीत. मुंबईतील लोकलसेवा ऑगस्ट महिन्यात सुरू करण्याचा विचार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यानुसार केंद्र सरकारच याबाबत विचार करेल. लोकल ट्रेन सुरू करणे हा राज्य सरकारच्या अंतर्गत येणारा विषय नाही, असंही अस्लम शेख यांनी सांगितलं.


हेही वाचा -

‘धारावी पॅटर्न’ मध्ये पोलिसांची कामगिरी ही खरीच कौतुकास्पद – अनिल देशमुख

गूड न्यूज! कोरोना रुग्णाच्या वाढीत घसरण, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात ७० टक्क्यांपर्यंत वाढ


पुढील बातमी
इतर बातम्या