सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे भाव स्वस्त झाले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत आहे. अनेक दिवस ९५ ते ९८ रुपयांच्या आसपास असलेलं पेट्रोलनं शंभरी गाठली आहे. त्यामुळं सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण आता लवकरच इंधनांचे दर कमी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते. अशात बुधवारी तब्बल २४ दिवसांनी पेट्रोलचे दर स्वस्त झाले होते. त्यानंतर आता आज पुन्हा इंधनाचे दर घसरले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा आहे.

पेट्रोलचे भाव

  • नवी दिल्ली : ९०.७८ रुपये प्रतिलीटर
  • मुंबई : ९७.१९ रुपये प्रतिलीटर
  • कोलकाता : ९०.९८ रुपये प्रतिलीटर
  • चेन्नई : ९२.७७ रुपये प्रतिलीटर
  • नोएडा : ८९.०८ रुपये प्रतिलीटर

डिझेलचे भाव

  • नवी दिल्ली : ८१.१० रुपये प्रतिलीटर
  • मुंबई : ८८.२० रुपये प्रतिलीटर
  • कोलकाता : ८३.९८ रुपये प्रतिलीटर
  • चेन्नई : ८६.१० रुपये प्रतिलीटर
  • नोएडा : ८१.५६ रुपये प्रतिलीटर

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.


हेही वाचा - 

दोन आठवड्यांत राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ लाखांपर्यंत, दिवसाला हजार मृत्यूंची शक्यता

बँकेची सर्व कामं लवकर करा, ७ दिवस बँका बंद


पुढील बातमी
इतर बातम्या