Advertisement

बँकेची सर्व कामं लवकर करा, ७ दिवस बँका बंद

बँकेत तुमची काही कामं असल्यास लवकर करून घ्या. कारण २७ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत बँका फक्त दोन दिवस चालू राहणार आहेत.

बँकेची सर्व कामं लवकर करा, ७ दिवस बँका बंद
SHARES

बँकेत तुमची काही कामं असल्यास लवकर करून घ्या. कारण २७ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत बँका फक्त दोन दिवस चालू राहणार आहेत. इतर ७  दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. 

महिन्यातील चौथा शनिवार आणि होळीच्या सणासाठी २७ मार्च ते २९ मार्च या काळात बँका बंद राहतील. त्यानंतर ३१ मार्चला बँकांना सुट्टी नाही. मात्र आर्थिक वर्ष संपत असल्याने इयर एडिंगच्या कामांसाठी बँकेचं दैनंदिन कामकाज बंद असणार आहे. ३० मार्च आणि ३ एप्रिल या दिवशी बँका चालू असतील. मात्र, इयर एडिंगच्या वर्क लोडमुळे या दोन दिवसांतही बँकांमध्ये कामकाज होण्याबाबत शंका आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने एक बँक कॅलेंडर जाहीर केले असून त्यात कोणत्या बँका काम करणार नाहीत त्या तारखांचा उल्लेख केला आहे. आरबीआयच्या वेबसाईटवर सुट्ट्यांची लिस्ट पाहू शकता. सोबत तुम्ही हेही पाहू शकता की प्रत्येक राज्यानुसार बँकेच्या सुट्ट्या वेगवेगळ्या आहेत.

या दिवशी बँका बंद

२७ मार्च – महिन्यातील शेवटचा शनिवार असल्याने बँका बंद 

२८ मार्च – रविवार असल्याने बँका बंद 

२९ मार्च – होळीची सुट्टी असल्याने बँका बंद 

३० मार्च – यादिवशी बँका सुरू राहतील, मात्र पाटण्यातील बँक व्यवहार बंद राहतील.

३१ मार्च – आर्थिक वर्ष संपत असल्याने दैनंदिन कामकाज नाही

१ एप्रिल – आर्थिक वर्ष संपत असल्याने दैनंदिन कामकाज नाही

२ एप्रिल – गुड फ्रायडेची सुट्टी असल्यामुळे बँका बंद 

३ एप्रिल – यादिवशी बँका सुरु राहणार.

४ एप्रिल –  रविवार आणि ईस्टर डेची सुट्टी असेल.



हेही वाचा -

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १५० जागांसाठी भरती

  1. तुम्हाला कर भरावा लागत नसेल तरी भरा आयटीआर, मिळतील 'हे' फायदे
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा