एपीएमसीमुळे 220 ते 230 कोरोना रूग्णांची भर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

मागील आठवड्यात नवी मुंबईत कोरोनाचा फैलाव वेगाने झाल्याचं दिसून आलं. नवी मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता 826 झाली आहे.  वाशीतील एपीएमसी मार्केटमधील व्यापारी, माथाडी कामगारांमुळे कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून आलं आहे.  

एपीएमसीमुळे 220 ते 230 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एपीएमसी तात्काळ बंद करण्याची मागणी नवी मुंबईकरांनी केली होती. तसंच भाजप आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना पत्रव्यवहार करून एपीएमसीमुळे कम्युनिटी संसर्ग पसरण्याची भिती असल्याने त्वरीत बंद करण्याची मागणी केली होती.  यावर आता सरकारने 11 ते 17 मे पर्यंत एपीएमसी मधील भाजीपाला, कांदा, बटाटा, फळं, मसाला, दाना मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

एक आठवडा मार्केट बंद केल्यानंतर या दरम्यान कामगार, व्यापारी, ट्रान्सपोर्टर अशी 18 ते 20 हजार जणांची स्किनिंग करण्यात येणार आहे. यात ज्यांना लक्षणे आढळतील त्यांना मार्केटमध्ये प्रवेश बंदी केली जावून त्यांचे कोरोना टेस्ट केल्या जाणार आहेत. मार्केट बंद राहिल्यानं मुंबईत येणाऱ्या मालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कोकण आयुक्त, नवी मुंबई मनपा आयुक्त, पोलिस, माथाडी कामगार, व्यापाऱ्यांची 8 मे रोजी बैठक झाली होती, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.


हेही वाचा -

मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी मिठाचा वापर, मागणीत प्रचंड वाढ

१२ मेपासून पॅसेंजर ट्रेन धावणार


पुढील बातमी
इतर बातम्या