Advertisement

मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी मिठाचा वापर, मागणीत प्रचंड वाढ

मागील काही दिवसांत मुंबईतील मिठाची मागणी वाढली आहे.

मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी मिठाचा वापर, मागणीत प्रचंड वाढ
SHARES

कोरोनाच्या काळात मागील काही दिवसांत मुंबईतील मिठाची मागणी वाढली आहे. मुंबई व आसपासच्या परिसरातील मिठाची मागणी चारपट वाढली आहे. मुंबईत दररोज जवळपास अडीच लाख किलो मिठाची मागणी असायची मात्र, आता १० लाख किलो मीठ विक्री होत असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मिठाचा वापर वाढला असल्याचे व्यापाऱ्यांचे निरीक्षण आहे.

हेही वाचा - १२ मेपासून पॅसेंजर ट्रेन धावणार

मुंबईत मिठाची मागणी वाढल्यानं तुटवडा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, पुरवठा सुरळीत असून मिठाचा २० टक्के साठा अतिरिक्त असल्याचं समजतं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत व्यापाऱ्यांकडून मिठाची मागणी चारपट वाढलं आहे. नागरिक बाहेरुन आणलेली प्रत्येक वस्तू मिठाच्या गरम पाण्यातून धुवून काढत आहेत. त्यामुळं मागणी वाढली आहे.

सध्या मुंबईत जवळपास १५ ब्रॅण्डेड व १५ लहान कंपन्यांचं मीठ बाजारात उपलब्ध आहे. वितरकांकडून पुरवठा सुरळीत आहे. भारतीय मीठ उत्पादक असोसिएशननुसार (इस्मा), देशात दरवर्षी साधारण ३६० लाख टन मिठाचं उत्पादन होतं. त्यापैकी ९० लाख टन मीठ खाद्यान्नासाठी, तर १०० लाख टन मीठ औद्योगिक वापरासाठी वापरलं जातं. उर्वरित १०० लाख टन मिठाची निर्यात होते.



हेही वाचा -

चिंताजनक! मुंबईत कोरोनाने आतापर्यंत 508 जणांचा घेतला बळी, 875 नवे रुग्ण

१२ मेपासून पॅसेंजर ट्रेन धावणार



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा