कार्याध्यक्ष चषक कॅरम स्पर्धेत काजल कुमारीला विजेतेपद

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रीडा

वरळीतील अादर्श नगर येथील खरुडे मंडई हॉलमध्ये रंगलेल्या सातव्या कार्याध्यक्ष चषक कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत इंडियन ऑईलच्या महम्मद गुफरानने जैन इरिगेशनच्या योगेश धोंगडेला २५-५, २५-४ असे सहज नमवून कार्याध्यक्ष चषकावर आपले नाव कोरले. तर महिला एकेरीच्या अंतिम फेरीत इंडियन ऑईलच्याच काजल कुमारीने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शिल्पा पळणीटकरला तीन सेटमध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये २५-१४, २०-२५, २५-०६ असे हरवून या गटाचे विजेतेपद पटकाविले. 

कुमारांमध्ये रितिकेश वाल्मिकीची बाजी

१८ वर्षंखालील मुलांच्या अंतिम फेरीमध्ये वरळी स्पोर्टस क्लबच्या रीतिकेश वाल्मिकीने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, नायगावच्या नीरज कांबळेला २५-११, १३-८ असे हरवून विजेतेपद पटकाविले. १८ वर्षाखालील मुलींमध्ये अंतिम सामन्यात शिवतारा कॅरम क्लबच्या अमूल्य राजूलाने ए. के. फाऊंडेशनच्या मृणाली सुर्वेवर १८-९, १८-५ असा विजय मिळविला अाणि विजेतेपद अापल्या नावावर केले. मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप मयेकर यांच्या हस्ते विजेत्यांना कार्याध्यक्ष चषक व रोख पारितोषिकांनी गौरविण्यात आले.


हेही वाचा -

मुंबई मानांकन कॅरम स्पर्धेत संगीता चांदोरकरची विजयी सलामी

पुढील बातमी
इतर बातम्या