Advertisement

कार्याध्यक्ष चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा वरळीत रंगणार


कार्याध्यक्ष चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा वरळीत रंगणार
SHARES

मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या वतीने सातव्या कार्याध्यक्ष चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेला वरळी येथील आदर्श नगरमधील खरुडे मंडई हॉल इथं गुरुवारपासून सुरुवात झाली अाहे. पुरुष एकेरी, महिला एकेरी, १८ वर्षांखालील मुले एकेरी व १८ वर्षांखालील मुली एकेरी अशा चार गटात ही स्पर्धा होणार असून जवळपास ३२६ खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना एकंदर ६० हजारांची रोख बक्षिसे व कार्याध्यक्ष चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.


पंकज पवारला अव्वल मानांकन


पुरुष एकेरीत जैन इरिगेशनच्या पंकज पवारला अव्वल मानांकन देण्यात अाले अाहे. अभिषेक भारतीला दुसरे तर योगेश धोंगडेला तिसरे मानांकन मिळाले अाहे. सध्या फाॅर्मात असलेल्या इंडियन अाॅईलच्या काजल कुमारी हिला महिलांमध्ये प्रथम मानांकन मिळाले अाहे. शिल्पा पळणीटकरला दुसरे तर नीलम घोडके हिला तिसरे मानांकन देण्यात अाले अाहे. 



कुमारांमध्ये सिद्धांतला अग्रमानांकन


१८ वर्षांखालील कुमार एकेरी गटात बँक अाॅफ इंडियाच्या सिद्धांत वाडवलकर याला अव्वल मानांकन देण्यात अाले अाहे. याच गटात रितिकेश वाल्मिकी अाणि सोहम उनावणे यांना अनुक्रमे द्वितीय अाणि तृतीय मानांकन मिळाले अाहे. कुमारींच्या गटात अनुल्या राजुला हिला अव्वल मानांकन मिळाले अाहे. भूमिका नेटके अाणि मृणाली सुर्वे यांना दुसरे अाणि तिसरे मानांकन मिळाले अाहे.


हेही वाचा - 

काजल कुमारीला फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेचं अजिंक्यपद

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा