Advertisement

काजल कुमारीला फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेचं अजिंक्यपद


काजल कुमारीला फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेचं अजिंक्यपद
SHARES

पेट्रोलियम स्पोर्टस प्रमोशन बोर्डच्या (पीएसपीबी) काजल कुमारी अाणि मोहम्मद गुरफान यांनी दादरच्या हलारी व्हिसा अोस्वाल समाज हाॅलमध्ये रंगलेल्या २४व्या फेडरेशन चषक अखिल भारतीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या विजेतेपदावर मोहोर उमटवली. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या अायोजनाखाली झालेल्या या स्पर्धेत काजलने जैन इरिगेशनच्या अायेशा मोहम्मद हिचा २५-१३, २५-१२ असा पराभव करत जेतेपद पटकावले.


पुरुषांमध्ये मोहम्मद गुरफान विजेता

पुरुषांच्या अंतिम सामन्यात गुरफानने वर्ल्ड चॅम्पियन प्रशांत मोरेचा २५-१३, १२-२५, २२-१९ असा पराभव करत विजेतेपद अापल्या नावावर केले. अापल्या घरच्या वातावरणात खेळणाऱ्या प्रशांत मोरेने पहिला गेम गमावूनही अापल्या चाहत्यांना निराश केले नाही. दुसरा गेम जिंकून प्रशांत मोरेने गुरफानला जशास तसे प्रत्युत्तर दिले. मात्र अखेरच्या क्षणी केलेल्या चुकांचा फटका त्याला बसला अाणि विजेतेपदापासून वंचित राहावे लागले.


दुहेरीत श्रीनिवास, संदीप देवरूखकरचा बोलबाला

पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात के. श्रीनिवास आणि संदीप देवरुखकर या पीएसपीबीच्या खेळाडूंनी योगेश परदेशी व के. रमेश बाबू जोडीला २२-२५, २५-१६, २५-१५ असे नमवत जेतेपद पटकावले. महिला दुहेरीत पीएसपीबीच्या नागज्योती व एल. ईलावझकी जोडीने रश्मी कुमारी व काजल कुमारी या त्यांच्याच सहकाऱ्यांना ४-२५, २५-११, २५-७ असे हरवत जेतेपदावर नाव कोरले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा