Advertisement

मुंबई मानांकन कॅरम स्पर्धेत संगीता चांदोरकरची विजयी सलामी


मुंबई मानांकन कॅरम स्पर्धेत संगीता चांदोरकरची विजयी सलामी
SHARES

वरळीतील अादर्श नगर येथील खरुडे मंडई हॉल येथे सुरू असलेल्या ७ व्या कार्याध्यक्ष चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रिझर्व्ह बँकेच्या संगीता चांदोरकर हिने भारतीय अायुर्विमा महामंडळाच्या शैला जाधव हिचा २५-७, २५-१ असा पराभव करून तिसऱ्या फेरीत मजल मारली अाहे. पुरुषांच्या एकेरी गटात, मुंबई महानगरपालिकेच्या गिरीश तांबेने बोरीचा कॅरम क्लबच्या जितेंद्र राठोडला २५-२, १७-२५, २५-४ असे पराभूत करून तिसऱ्या फेरीत फेरीत प्रवेश केला. जैन इरिगेशनच्या योगेश धोंगडेने ए. के. फौंडेशनच्या अमोल चारकारी याच्यावर २५-१३, २५-२० अशी मात केली.


फैझान अन्सारीची अागेकूच

वरळी स्पोर्टस क्लबच्या फैझान अन्सारीने मुंबई पोर्ट ट्रस्टच्या भास्कर कदम याचा २५-०, २५-० असा धुव्वा उडवला. बोरीचा स्पोर्टस क्लबच्या रवी जोगडियाने गोविंद वाडेकरला २५-७, २५-९ असे सहज पराभूत केले. मुंबई महानगरपालिकेच्या दिनेश केदार याने धर्मेंद्र कुमार याचा २५-१८, २५-११ असा पाडाव करून तिसऱ्या फेरीत मजल मारली.


महिलांमध्ये नीलम घोडकेचा विजय

महिलांमध्ये जैन इरिगेशनच्या तिसऱ्या मानांकित नीलम घोडके हिने इंडियन अाॅईलच्या माधुरी तायशेटे हिला २५-४, २५-० असा पराभवाचा धक्का दिला. प्रीती खेडेकर हिने वैभवी शेवाळे हिला २५-४, २५-८ असे सहज पराभूत करत तिसरी फेरी गाठली. रिझर्व्ह बँकेच्या उर्मिला शेंडगे हिने जान्हवी मोरे हिला २५-१२, २५-२० असे हरवत विजयी अागेकूच कायम राखली.


हेही वाचा - 

कार्याध्यक्ष चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा वरळीत रंगणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा