राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नील राॅयचा नवा विक्रम

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रीडा

महाराष्ट्राच्या नील राॅयने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत तिसऱ्या दिवशी नव्या विक्रमाची नोंद करत स्वत:चाच विक्रम मोडित काढला. १७ वर्षांखालील मुलांच्या २०० मीटर वैयक्तिक मेडले प्रकारात नील राॅयने राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदक पटकावले. बंगळुरू येथील २०१६च्या राष्ट्रीय स्पर्धेत स्वत:च रचलेला विक्रम नीलने मोडला.

हृदयी वाघला सुवर्ण

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ३५व्या सबज्युनियर अाणि ४५व्या ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एसएफअायच्या बिल्वा गिरम अाणि हृदयी वाघ यांनीही सुवर्णपदकाला गवसणी घातली. बिल्वाने ३ मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात तर हृदयीनं प्लॅटफाॅर्म प्रकारात सुवर्णपदक पटकोवले.


हेही वाचा -

कसोटी क्रिकेट हे आईच्या हातचं जेवण - बलविंदर सिंग संधू

क्रिकेटपटूंची कारकीर्द बरबाद करू नका, संदीप पाटील भडकले


पुढील बातमी
इतर बातम्या