अाॅटर्स इंटरक्लब ज्युनियर स्क्वाॅश लीग २१ जुलैपासून

पावसाळ्यात सध्या इन्डोअर स्पर्धांचा हंगाम सुरू असताना अाॅटर्स क्लबने २१ ते २३ जुलैदरम्यान अाॅटर्स इंटरक्लब ज्युनियर स्क्वाॅश लीगचे अायोजन केले अाहे. या लीगमध्ये मुंबईतील नामांकित क्लब विजेतेपदासाठी एकमेकांशी झुंज देणार अाहेत. स्क्वाॅश रॅकेट्स असोसिएशन अाॅफ महाराष्ट्रच्या मान्यतेने इंडियन स्क्वाॅश प्रोफेशनल्सने या स्पर्धेचे अायोजन केले अाहे.

हे असतील संघ

या स्पर्धेत अव्वल अाठ क्लब सहभागी होणार असून प्रत्येकी चार संघांची दोन गटात विभागणी करण्यात अाली अाहे. अ गटात यजमान अाॅटर्स क्लब, नॅशनल स्पोर्ट्स क्लब अाॅफ इंडिया, जुहू विलेपार्ले जिमखाना क्लब अाणि क्रिकेट क्लब अाॅफ इंडिया-अ तसेच ब गटात चेंबूर जिमखाना, जिंदाल स्क्वाॅश अकादमी, क्रिकेट क्लब अाॅफ इंडिया-ब अाणि गोरेगाव स्पोर्टस क्लब हे संघ असतील.

स्पर्धेचे स्वरूप

ही स्पर्धा, ९, ११, १३, १५ अाणि १७ वर्षांखालील वयोगटात खेळविण्यात येतील. प्रत्येक संघात किमान ५ अाणि जास्तीत जास्त १० खेळाडू असतील. प्रत्येक प्रकारासाठी ५ खेळाडू हे राखीव असतील. त्याचबरोबर प्रत्येक संघात एका महिला खेळाडूचा समावेश बंधनकारक राहील. या स्पर्धेतील अव्वल तीन संघांना प्रत्येकी ४० हजार, २५ हजार अाणि १५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.


हेही वाचा -

सचिन तेंडुलकरची नवी इनिंग, करणार कोचिंग!

अभिषेक नायर बनला केकेअार अकादमीचा मुख्य प्रशिक्षक


पुढील बातमी
इतर बातम्या