Advertisement

सचिन तेंडुलकरची नवी इनिंग, करणार कोचिंग!

एसअारटी स्पोर्टस मॅनेजमेंट लिमिटेड अाणि मिडलसेक्स क्रिकेट यांनी नाॅर्थवूडमधील मर्चंट टेलर स्कूलमध्ये पहिलं क्रिकेट प्रशिक्षण शिबिर अायोजित केलं अाहे. त्यानंतर मुंबई अाणि लंडन यांसारख्या अन्य ठिकाणी ही प्रशिक्षण शिबिरं घेतली जाणार अाहेत.

सचिन तेंडुलकरची नवी इनिंग, करणार कोचिंग!
SHARES

मास्टलब्लास्टर सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर काय करणार, ही चर्चा गेले कित्येक महिने रंगली होती. पण अाता त्याचं उत्तर मिळालं अाहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर अाणि इंग्लंडमधील मिडलसेक्स क्रिकेट क्लब या क्रिकेटमधील दोन विद्यापीठांनी एकत्र येत तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमीची (टीएमजीए) स्थापना केली असून लवकरच मास्टरब्लास्टर ९ ते १४ वर्षांखालील मुलांना प्रशिक्षणाचे धडे देताना दिसणार अाहे.


पहिलं शिबिर नाॅर्थवूडमध्ये

एसअारटी स्पोर्टस मॅनेजमेंट लिमिटेड अाणि मिडलसेक्स क्रिकेट यांनी नाॅर्थवूडमधील मर्चंट टेलर स्कूलमध्ये पहिलं क्रिकेट प्रशिक्षण शिबिर अायोजित केलं अाहे. त्यानंतर मुंबई अाणि लंडन यांसारख्या अन्य ठिकाणी ही प्रशिक्षण शिबिरं घेतली जाणार अाहेत.


या नव्या उपक्रमासाठी मिडलसेक्स क्रिकेटशी हातमिळवणी केल्याचा अानंद होत अाहे. फक्त चांगले क्रिकेटपटू घडविण्याचे नव्हे तर भविष्यात चांगले नागरिक घडविण्याचा अामचा उद्देश अाहे. या भागीदारीद्वारे मिडलसेक्स अाणि मी अामच्या प्रशिक्षणार्थींना सर्वोत्तम असं क्रिकेटचं प्रशिक्षण देण्यावर भर देणार अाहोत.
- सचिन तेंडुलकर, भारताचा महान क्रिकेटपटू


काय शिकवणार या शिबिरात?

एमसीसीसीच्या व्यावसायिक प्रशिक्षकांनी अाणि खुद्द सचिन तेंडुलकरने विकसित केलेला व्यापक प्रशिक्षण अभ्यासक्रम शिकता येणार अाहे. त्याचबरोबर क्रीडा मानसशास्त्र, खेळातील तांत्रिक सुधारणा तसेच रणनीती अाखणे, शारीरिक तंदुरुस्ती यांसारख्या महत्त्वपूर्ण गोष्टींचाही युवा अाणि होतकरू क्रिकेटपटूंना लाभ उठवता येणार अाहे. त्याचबरोबर अार्थिकदृष्ट्या वंचित मुलांसाठी १०० टक्के स्काॅलरशिपही दिली जाणार अाहे.


हेही वाचा -

लोकलच्या सुखकर प्रवासासाठी सचिन तेंडुलकरचा पुढाकार

सचिन तेंडुलकरने जागवल्या सावंतवाडी दौऱ्याच्या अाठवणी



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा