Advertisement

सचिन तेंडुलकरने जागवल्या सावंतवाडी दौऱ्याच्या अाठवणी


सचिन तेंडुलकरने जागवल्या सावंतवाडी दौऱ्याच्या अाठवणी
SHARES

मी १३ वर्षांचा असताना रमाकांत अाचरेकर सर अाम्हाला सावंतवाडी दौऱ्यावर घेऊन गेले होते. प्रवीण अमरे, विनोद कांबळी, समीर दिघे यांच्यासारखे खेळाडू अामच्यासोबत होते. प्रतिस्पर्धी संघही तितकाच ताकदवान होता. त्यांच्या संघातही रणजी ट्राॅफी खेळलेले प्लेयर्स होते. अातापर्यंत अाम्हाला फक्त मुंबईतच खेळण्याचा अनुभव होता. पण सावंतवाडीमध्ये जाऊनही अाम्ही चांगली कामगिरी केली होती. अाजही मला त्या दौऱ्याची अाठवण येते. अाता अाम्ही काही मित्र एकत्र जमतो, तेव्हा या दौऱ्याच्या अाठवणी शेअर करतो. त्या दौऱ्यात फक्त मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेरही अनेक किस्से घडले होते. त्या अाठवणी तुमच्यासोबत कायम राहतात. अशा दौऱ्यातून अनेक गोष्टी शिकता येतात अाणि माणूस म्हणून स्वतःला परिपक्त करत असतात, अशा शब्दांत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनं सावंतवाडी दौऱ्याच्या अाठवणींना उजाळा दिला.


तरुणांसाठी मुंबई टी-२० लीग हे उत्तम व्यासपीठ

सध्या विविध स्तरावर स्पर्धां होत अाहेत. पण अनेक तरुणांना सिझन बाॅलने खेळण्याची संधी मिळत नाही. तसंच अनेक होतकरू खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळत नाहीत. अाता टी-२० मुंबई लीगद्वारे युवा अाणि होतकरू खेळाडूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध होईल. अनेक तरुण खेळाडू या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक अाहेत, असं या लीगचा ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या सचिन तेंडुलकरने वांद्रे येथील ताज लँड्स एन्डमध्ये झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) पत्रकार परिषदेत सांगितले.


अाणि सचिन मराठीत बोलला...

अातापर्यंत अनेक कार्यक्रमांमध्ये सचिन तेंडुलकरला मराठीत बोललेलं मोजक्याच वेळा त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळालं असेल. अनेक कार्यक्रमात सचिन हिंग्लिशमधूनच बोलत असतो. पण टी-२० मुंबई लीगच्या निमित्तानं सचिननं मराठीतून संवाद साधला.


हेही वाचा - 

सचिन तेंडुलकरची टी-२० मुंबई लीगच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी निवड 

एमसीएच्या मुंबई टी-२० लीगचा पुन्हा फियास्को? दुसऱ्यांदा मागवल्या संघांसाठी निविदा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा