Advertisement

सचिन तेंडुलकरची टी-२० मुंबई लीगच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी निवड


सचिन तेंडुलकरची टी-२० मुंबई लीगच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी निवड
SHARES

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) बहुप्रतिक्षित अशा टी-२० मुंबई लीगच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती करण्यात अाली अाहे. अनेक वेळा घोषणा अाणि तारखा जाहीर करूनही एमसीएला ही स्पर्धा अायोजित करणं शक्य झालं नव्हतं. अाता ११ मार्च ते २८ मार्चदरम्यान टी-२० मुंबई लीग अायोजित केली जाणार अाहे.


मुंबई क्रिकेट असोसिएशनशी जोडले जाणे, हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण अाहे. टी-२० मुंबई लीगद्वारे फक्त क्रिकेटशौकिनांचे मनोरंजन होणार नाही तर या स्पर्धेद्वारे मुंबईतील गुणी क्रिकेटपटूंसाठी एक चांगले व्यासपीठ मिळेल.
- सचिन तेंडुलकर, भारताचा माजी क्रिकेटपटू


सहा संघांचा समावेश

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिपत्याखाली अाणि प्रोबॅबलिटी स्पोर्टसमार्फत होणाऱ्या या स्पर्धेत सहा संघ विजेतेपदासाठी झुंजणार अाहेत. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य अाणि मुंबई दक्षिण असे सहा संघ शहरांच्या नावाने खेळवण्यात येतील. सहा संघांसाठी अाता निविदा मागवण्यात अाल्यामुळे या संघांची नावे निश्चित करण्यात अालेली नाहीत.


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसारखा दिग्गज खेळाडू टी-२० मुंबई लीगच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी असणे, ही अामच्यासाठी अभिमानाची अाणि भाग्याची बाब अाहे. सचिनची अफाट लोकप्रियता अाणि अफाट ज्ञान याचा फायदा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी होईल.
- कादर मकानी, सीईअो, प्रोबॅबलिटी स्पोर्टस

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा