Advertisement

अभिषेक नायर बनला केकेअार अकादमीचा मुख्य प्रशिक्षक


अभिषेक नायर बनला केकेअार अकादमीचा मुख्य प्रशिक्षक
SHARES

मुंबईच्या संभाव्य रणजी संघातून डावलण्यात अाल्यानंतर मुंबईचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायरकडे पुद्दूचेरी संघाच्या प्रशिक्षकपदाची अाॅफर अाली होती. मात्र ही अाॅफर न स्वीकारता अभिषेक नायरने अायपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स या फ्रँचायझीच्या केकेअार अकादमीचा मुख्य प्रशिक्षक अाणि सल्लागार ही अाॅफर स्वीकारली अाहे. केकेअारने गुरुवारी केकेअार अकादमीची घोषणा केली असून केकेअारचे मुख्य कार्यकारी अधिकारी अाणि व्यवस्थापकीय संचालक वेंकी म्हैसूर यांनी अभिषेक नायरच्या नियुक्तीची घोषणा केली.


१००व्या सामन्याची प्रतीक्षा

अभिषेक नायर मुंबईकडून ९९ प्रथम श्रेणी सामने खेळला असून त्याला १००व्या सामन्याची प्रतीक्षा लागून राहिली अाहे. नायरने तीन सामन्यांत भारतीय संघाचेही प्रतिनिधीत्व केले अाहे. केकेअारकडे गुणी खेळाडूंचा भरणार असून क्रिकेटचा मोसम नसताना त्यांना या उपक्रमामुळे चांगला खेळाडू होण्यास मदत होईल. भविष्यातील क्रिकेटपटू घडवण्यासाठी केकेअारने केलेली ही गुंतवणूक खूप मोलाची अाहे, असे नायरने सांगितले.


कोलकाता संघातील खेळाडूंना मोसमाव्यतिरिक्त प्रशिक्षण अाणि अन्य सुविधा पुरवणे, हा या अकादमीचा मुख्य उद्देश अाहे. एक क्रिकेटपटू या नात्याने त्याची खेळाप्रतीची अावड, जाण वादातीत अाहे. खेळाडूंना अधिक परिपक्व होण्यासाठी अभिषेकची मदतच होईल. या उपक्रमासाठी नायर योग्य अाहे.
- वेंकी म्हैसूर, केकेअारचे सीईअो अाणि एमडी


अोमकार साळवी गोलंदाजी प्रशिक्षकपदी

मुंबईचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक अोमकार साळवी यांची केकेअार अकादमीच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात अाली अाहे. अोमकार साळवी हे मुंबईच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होते. त्याअाधीच त्यांनी ही अाॅफर स्वीकारली अाहे. केकेअार अकादमीच्या पहिल्या शिबिराला बंगळुरू येथे जस्ट क्रिकेट इन्डोअर स्टेडियममध्ये सुरुवात होत अाहे.


हेही वाचा -

भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदावरून तुषार अारोठे पायउतार

मुंबईच्या प्रशिक्षकांची निवड लांबणीवर?



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा