सहा वर्षांच्या चिमुरडीचं सचिनला पत्र

सचिन काका मी तारा... जशी सारा दिदी तशीच मी... पण माझे वय सहा वर्ष आहे. मी तुमचे लहानपणीचे फोटो पाहिले. मला तुम्हाला, सारा दिदी, अर्जुन भाई आणि अंजली काकींना भेटायला यायचे आहे...

हे वाचून तुम्ही विचारात पडला असाल ना? एका सहा वर्षांच्या चिमुकलीने हे पत्र लिहले आहे ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे जगभरात चाहते आहेत. मग ते लहान मुलांपासून अगदी वयस्कर मंडळींपर्यंत. अशाच एका सहा वर्षाच्या मुलीने तिच्या खास शैलीत सचिनला एक पत्र लिहले आहे. हे पत्र वाचून सचिन देखील खूश झाला आहे. त्याने या पत्राचा एक फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

पत्र लिहिणाऱ्या या मुलीचे नाव तारा आहे. ती सहा वर्षांची आहे. सचिनच्या नुकत्याच येऊन गेलेल्या चित्रपटावर ताराने हे पत्र लिहले आहे. यात तिने म्हटले आहे, 'मी तुमचा चित्रपट पाहिला आणि मला खूप आवडला. मला हसायला आले जेव्हा तुमचे लहानपणीचे फोटो पाहिले. पण तुमची शेवटची मॅच पाहून मी रडले देखील'.


हेही वाचा - 

सचिन तेंडुलकरचा फिटनेस फंडा!

सचिनचं स्वप्न अर्जुन पूर्ण करेल - ग्लेन मॅकग्रा

पुढील बातमी
इतर बातम्या