सचिन तेंडुलकरचा फिटनेस फंडा!

 Mumbai
सचिन तेंडुलकरचा फिटनेस फंडा!

सर्वात जास्त काळ क्रिकेट खेळणारा जगातला एकमेव खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. तब्बल 24 वर्ष सचिन भारतीय क्रिकेटचं प्रतिनिधित्व करत होता. एकीकडे नवोदित खेळाडू काही वर्षांनंतर दुखापतीमुळे किवा इच्छेमुळे निवृत्त होत असतानाच सचिन मात्र खेळतच होता. इतकी वर्ष खेळण्यासाठी लागणारा स्टॅमिना आणि फिटनेस सचिनकडे आला कुठून? सचिननंच याचं उत्तर दिलं आहे!


20 ऑगस्टपासून मॅरेथॉन

आयडीबीआय फेडरलतर्फे येत्या 20 ऑगस्टला मुंबईत हाफ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचं उद्घाटन सचिन तेंडुलकरच्या हस्ते होणार आहे. त्याची औपचारिक घोषणा गुरुवारी मुंबईत करण्यात आली. यावेळी सचिन बोलत होता.


काय आहे सचिनचा फिटनेस फंडा?

सचिन त्याच्या फिटनेसचं श्रेय त्याचे प्रशिक्षक आणि गुरु रमाकांत आचरेकर सरांना देतो. 'फिटनेस हा आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आचरेकर सर मला रोज शिवाजी पार्क ग्राऊंडला दोन राऊंड मारायला सांगायचे. त्यांनी त्या वेळी माझ्याकडून जो सराव करुन घेतला, नंतर तेच माझ्यासाठी रूटीन झालं. माझ्या दीर्घ क्रिकेट कारकिर्दीसाठी मला ते महत्त्वाचं ठरलं, असं सचिन यावेळी म्हणाला.


बुट आणि सॉक्सची आठवण...

धावणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं यासाठी सचिनने यावेळी 100 बुट दिले. यावेळी सचिनने त्याच्या कारकिर्दीतल्या काही आठवणींनाही उजाळा दिला. 1990 साली झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्याची आठवण सचिनने सांगतली. या सामन्यात सचिनने नाबाद 143 रन्स केले होते. सचिन म्हणाला, 'तिथलं वातावरण फार कठीण होतं. एप्रिल महिन्यात तर तिथे तापमान खूप जास्त असतं. आमच्या बुट आणि सॉक्समुळे शरीरात मोठ्या प्रमाणावर उष्णता तयार होत होती. म्हणून मग आम्ही पाय थंट बर्फाच्या टबमध्ये टाकून बसायचो.'हेही वाचा

सचिनचं स्वप्न अर्जुन पूर्ण करेल - ग्लेन मॅकग्रा


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments