शिवाजी पार्कात घ्या तलवारबाजीचे प्रशिक्षण


  • शिवाजी पार्कात घ्या तलवारबाजीचे प्रशिक्षण
  • शिवाजी पार्कात घ्या तलवारबाजीचे प्रशिक्षण
SHARE

उन्हाळ्यात दरवर्षी विविध खेळांचे प्रशिक्षण देणाऱ्या शिवाजी पार्क येथील समर्थ व्यायाम शाळेत यंदा पारंपरिक खेळांचे प्रशिक्षण दिले जात आहे. 

समर्थ व्यायाम शाळा आणि चौल, अलिबाग येथील श्रीराम स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे दादर शिवाजी पार्क येथे 30 मे पर्यंत पहिले समर्थ लाठी- काठी, दांडपट्टा, तलवारबाजी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. हे शिबीर सायंकाळी 6 ते 8 या वेळात दररोज 2 तास समर्थ व्यायाम शाळेसमोर होईल.

10 वर्षांपासून खुल्या गटातील मुला-मुलींसाठी हे शिबीर आहे. या शिबिरात अलिबाग येथील श्रीराम स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष शिरीष नाईक व त्यांचे सहकारी मार्गदर्शन करत असून बुधवारी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या