Advertisement

खेळ हा माझा अभ्यास आहे - तेंडुलकर


खेळ हा माझा अभ्यास आहे - तेंडुलकर
SHARES

यशाची सर्वोच्च शिखरे पादाक्रांत केल्यानंतरही जमिनीवर पाय कसे ठेवावेत, याचे शिक्षण आपल्या वर्तणुकीतून देण्याचे काम भारताचा सर्वकालीक श्रेष्ठ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर देत आहे. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतरही क्रिकेट, खरे तर क्रीडाप्रकारांबद्दल त्याला  वाटणारा ओढा कमी झालेला नाही. क्रीडापटूंच्या नव्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी सचिनने त्यांना 'क्रीडा क्षेत्रात मोठे यश संपादन करा', असा सल्ला दिला आहे. सर्वजण सचिनला क्रिकेटमधला गुरु मानत असले तरी आपण अद्याप विद्यार्थी आहोत, अशी नम्र प्रतिक्रिया त्याने दिली आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (एसपीएन) या वहिनीचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सचिन तेंडुलकरची निवड करण्यात आली आहे. यानिमित्त 18 जुलैला मुंबईत झालेल्या कार्यक्रमात तो बोलत होता. 

2020 पर्यंत भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने तरुणांचा देश बनेल. देशातील तरुणांनी क्रीडा क्षेत्रात मोठे यश मिळवण्याची आज गरज आहे, असे भाकीत त्याने वर्तवले आहे. 


खेळ हा माझा अभ्यास - सचिन


सचिन म्हणतो 'मी विद्यार्थी असून खेळ हा माझा अभ्यास आहे. तो मी आयुष्यभर करत राहीन. काही जण खेळाला व्यवसाय म्हणतात, पण मला ते आवडत नाही. मी नेहमीच खेळात सक्रिय असतो. त्यासाठी मी फिट राहतो. त्याप्रमाणे देशातील तरुणांनीही फिट राहिले पाहिजे. टीव्हीवर फक्त खेळ पाहण्याऐवजी त्यात तरुणांनी आपला सहभाग नोंदवला पाहिजे'.

मागच्या वर्षी रिओ ऑलिम्पिकमध्ये झालेला महिलांचा रग्बी विश्वचषक हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव होता. आपण क्रिकेटशिवाय इतर खेळांनाही प्राधान्य द्यायला हवे. ऑक्टोबरमध्ये फिफाचा अंडर-17 विश्वचषक सुरू होणार आहे. ही एक चांगली संधी आपल्याला मिळाली आहे. प्रेक्षक वर्ग आयोजकांना नाराज करणार नाही, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.




हेही वाचा -

'हा' आहे सचिनचा नवीन फिटनेस फंडा!

१० हजार तासांच्या व्हिडिओतून साकारला 'सचिन'!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा