Advertisement

'हा' आहे सचिनचा नवीन फिटनेस फंडा!


'हा' आहे सचिनचा नवीन फिटनेस फंडा!
SHARES

क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकरला आरोग्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा संदेश देताना आपण पहिले असेल. याआधी त्याने दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याचा सल्ला देतानाचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. आता सचिनने आणखी एक नवीन फिटनेसचा फंडा सांगणारा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्याने 'धावाल तर फिट राहाल' असा संदेश दिला आहे. मुंबईत 20 ऑगस्टला होणाऱ्या हाफ मॅरेथॉनच्या निमित्ताने सचिनने हा व्हिडिओ ट्विट केला आहे.


काय सांगतोय सचिन!

फिटनेसच्या जनजागृतीसाठी सचिनने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये क्रिकेट खेळत असताना आपल्याला फिट राहणे किती आवश्यक होते हे सचिनने सांगितले आहे. सचिनप्रमाणेच या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनीही फिटनेस किती महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी धावणे किती लाभदायी आहे, हे सांगितले आहे. हा व्हिडिओ जनजागृती करण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरत आहे. आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत फिट राहिल्यामुळेच आपण 34 हजार धावा करू शकलो, असे सचिन या व्हिडिओमध्ये सांगतोय.


आयडीबाआय फेडरल लाईफ इन्शुरन्स कंपनीने विविध शहरांत मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. त्याचा ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून सचिनची निवड करण्यात आली आहे. येत्या 20 ऑगस्टला मुंबईत हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 10 किमी पर्यंतची हाल्फ मॅरेथॉन आणि 5 किमीची हेरिटेज रन असणार आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना http://www.mumbaihalfmarathon.com या संकेतस्थळावर रजिस्टर करता येणार आहे.




हे देखील वाचा - 

१० हजार तासांच्या व्हिडिओतून साकारला 'सचिन'!

व्यायामाच्या या टिप्स लक्षात ठेवा..नाहीतर व्यायाम जिवावर बेतू शकतो!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा