फिटनेस गुरूंनी दिला तरुणांना आरोग्यमंत्र

  मुंबई  -  

  मुंबई - भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. पण रोजच्या धकाधकीच्या जीवनात फिट आणि आजारांपासून लांब रहायचं, तर व्यायाम हा सर्वाेत्तम उपाय आहे.

  सतत धावणाऱ्या या शहरात तरुण मंडळींनी व्यायाम करणं गरजेचं आहे. भारताच्या पहिल्या महिला फिटनेस ट्रेनर लीना मोगरे यांचंही तेच म्हणणं आहे, त्या म्हणतात की, आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी तरुणाईनं व्यायाम आणि फिटनेसबद्दल जागरुक असणं गरजेचं आहे. नाही तर आपण भविष्यात 'अनफिट देश' म्हणून ओळखले जाऊ. माधुरी दीक्षित, जॉन अब्राहम, आणि बिपाशा बासू अशा सिनेताऱ्यांना फिटनेसचे फंडे सांगणाऱ्या लीना मोगरेंनी व्यायामाचे फायदेही सांगितलेत. त्या म्हणतात की, उत्तम आरोग्य हा जीवनातला महत्त्वाचा भाग आहे. उत्तम आरोग्य राखण्यासाठी औषध, स्टेराइड्सपेक्षा व्यायाम हाच चांगला पर्याय आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.