यूके युनायटेडने जिंकली डब्ल्यूसीजी रिंक हाॅकी स्पर्धा

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रीडा

देविंदर वाल्मिकी अाणि युवराज वाल्मिकी यांच्या शानदार खेळाच्या जोरावर यूके युनायटेडने मुंबई कस्टम्सचा ५-२ असा धुव्वा उडवत विलिंग्डन कॅथलिक जिमखाना अायोजित विक्टर डिमेलो चषक रिंक हाॅकी स्पर्धेच्या पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले. विजेत्या यूके युनायटेड संघाला २५ हजार रुपये अाणि चषक तसेच मुंबई कस्टम्सला १५ हजार रुपये अाणि चषक देऊन गौरवण्यात अाले. मुंबई कस्टम्सचा जयेश जाधव हा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.

देविंदर वाल्मिकीचा धमाका

अाॅलिम्पियन हाॅकीपटू देविंदर वाल्मिकीने सुरुवातीलाच दोन गोल करत यूके युनायटेडला अाघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर जयेश जाधवने दोन गोल करत मुंबई कस्टम्सला मध्यंतराला २-२ अशी बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर देविंदरचा मोठा भाऊ अांतरराष्ट्रीय हाॅकीपटू युवराजने दोन करत यूके युनायटेडची अाघाडी वाढवली. देविंदरने या सामन्यात तीन तर युवराजने दोन गोल केले.

रिबेल्सने जिंकले वरिष्ठांचे जेतेपद

रिबेल्स स्पोर्टस क्लबने अप्रतिम कामगिरी करत कलिना व्हिलेज बाॅइज संघाचा ७-३ असा पराभव करत वरिष्ठांच्या गटाचे विजेतेपद पटकावले. सालोमन अलेक्झांडरने गोलांची हॅटट्रिक साजरी करत विजयात मोलाचे योगदान दिले. मदन विश्वनाथनने दोन तर मेघराज एस. अाणि अब्राहम मॅथ्यूजने एक गोल नोंदवला.


हेही वाचा - 

युवराज वाल्मिकीचा गोल्सचा सिक्सर, यूके युनायटेडचा दणदणीत विजय

देविंदर वाल्मिकीच्या डबल गोलमुळे यूके युनायटेड उपांत्य फेरीत

पुढील बातमी
इतर बातम्या