Advertisement

देविंदर वाल्मिकीच्या डबल गोलमुळे यूके युनायटेड उपांत्य फेरीत


देविंदर वाल्मिकीच्या डबल गोलमुळे यूके युनायटेड उपांत्य फेरीत
SHARES

अाॅलिम्पियन देविंदर वाल्मिकीच्या शानदार कामगिरीमुळे मालाडच्या यूके युनायटेडने उपांत्यपूर्व फेरीत कूर्ग इलेव्हनचा २-१ असा पाडाव करत विलिंग्डन कॅथलिक जिमखाना अायोजित ३७व्या विक्टर डिमेलो स्मृती चषक रिंक हाॅकी स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. देविंदर वाल्मिकीने दोन्ही गोल लगावत या सामन्यात छाप पाडली. मुंबई हाॅकी असोसिएशन लिमिटेडच्या मान्यतेने जिमखान्याच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत कूर्ग इलेव्हनकडून एकमेव गोल राहील पी. याने नोंदवला.


मुंबई कस्टम्सचा विजय

दरम्यान, मुंबई कस्टम्सने सीव्ह्यू एससी संघाचा २-१ अशा फरकाने पाडाव करत अागेकूच केली. जयेश जाधव अाणि धरमवीर यादव यांनी कस्टम्सला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. कस्टम्सची उपांत्य फेरीत काॅम्पेनरोस एससी संघाशी गाठ पडेल. काॅम्पेनरोस एससीने सेंट्रल रेल्वेचा ५-३ असा पाडाव केला.


सालोमन अलेक्झांडरचे चार गोल

वरिष्ठ गटात, सालोमन अलेक्झांडर यांनी झळकाविलेल्या चार गोलांच्या बळावर रिबेल्स एससीने अवे मारिया संघाचा ५-३ असा पराभव केला. मेघराज एस.ने रिबेल्ससाठी पाचवा गोल केला. अवे मारियाकडून निरेल पिमेंटा, नासीर, खोंडकर अाणि जाॅन फर्नांडेस यांनी गोल केले.


हेही वाचा -

युवराज वाल्मिकीचा गोल्सचा सिक्सर, यूके युनायटेडचा दणदणीत विजय

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा