Advertisement

युवराज वाल्मिकीचा गोल्सचा सिक्सर, यूके युनायटेडचा दणदणीत विजय


युवराज वाल्मिकीचा गोल्सचा सिक्सर, यूके युनायटेडचा दणदणीत विजय
SHARES

युवराज, देवेंद्र अाणि अनुप या वाल्मिकी बंधूंच्या गोलधडाक्यामुळे यूके युनायटेडने सॅव्हियो स्पोर्टस क्लबचा १५-० असा धुव्वा उडवत ३७व्या विक्टर डिमेलो स्मृती चषक रिंक हाॅकी स्पर्धेत दमदार विजयाची नोंद केली. मुंबई हाॅकी असोसिएशन लिमिटेडच्या मान्यतेने विलिंग्डन कॅथलिक जिमखान्यातर्फे अापल्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा माजी अाघाडीवीर युवराज वाल्मिकीने अापली दुहेरी हॅटट्रिक साजरी केली. हाॅकीमध्ये अशाप्रकारची कामगिरी अभावानेच पाहायला मिळते. त्याला चांगली साथ देताना अाॅलिम्पियन देवेंद्र अाणि अनुपने प्रत्येकी दोन गोल नोंदवले.


बाॅम्बे रिपब्लिकन्सचा सहज विजय

दुसऱ्या सामन्यात, बाॅम्बे रिपब्लिकन्स संघाने जॅब्लोंस्की एससीचा ८-० अशा फरकाने सहज पाडाव केला. निखिल परदेशी, कुशल मेघवाल, विनीत शेट्टी अाणि वेंकटेश देवकर यांनी प्रत्येकी दोन गोल लगावत अापल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.


काॅम्पेनरोस एससीची अागेकूच

काॅम्पेनरोस एससीने यशस्वी घोडदौड करताना रिव्हेंजर्स एससीचा ५-१ असा पराभव केला. अाॅरिस्टन डिसूझाने शानदार हॅटट्रिक साजरी करत काॅम्पेनरोस एससीच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. जेस किन्नी अाणि मेल्चर फर्नांडेस यांनी प्रत्येकी एक गोल लगावला. पराभूत संघाकडून दिग्विजय शिंदेने एकमेव गोल केला.


हेही वाचा -

विलिंग्डन कॅथलिक जिमखाना रिंक हाॅकी स्पर्धा मंगळवारपासून

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा