Advertisement

विलिंग्डन कॅथलिक जिमखाना रिंक हाॅकी स्पर्धा मंगळवारपासून


विलिंग्डन कॅथलिक जिमखाना रिंक हाॅकी स्पर्धा मंगळवारपासून
SHARES

विलिंग्डन कॅथलिक जिमखान्यातर्फे वार्षिक विक्टर डिमेलो स्मृती चषक रिंक हाॅकी स्पर्धा ३ ते ७ एप्रिलदरम्यान सांताक्रूझ येथील जिमखान्याच्या टेनिस कोर्टवर अायोजित करण्यात अाली अाहे. मुंबई हाॅकी असोसिएशन लिमिटेडच्या मान्यतेने होणारी ही स्पर्धा पुरुष खुली, महिला, वरिष्ठ पुरुष या गटात खेळविण्यात येणार अाहे. बाद फेरीद्वारे खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेतील महिलांसाठी अाणि वरिष्ठ पुरुषांसाठीचे सामने २० मिनिटांचे तर पुरुषांचे सामने २५ मिनिटांचे खेळविण्यात येणार अाहेत.


अाघाडीचे खेळाडू खेळणार

मुंबईतील सर्व अाघाडीचे खेळाडू या पाच दिवसांच्या स्पर्धेत खेळणार अाहेत. गतविजेता अवे मारिया स्पोर्टस क्लब, उपविजेता मुंबई कस्टम्स, सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, बाॅम्बे रिपब्लिकन्स, काॅम्पेनरोस एससी, सी व्ह्यू एससी, हाॅकी सांताक्रूझ, यूके युनायटेड, जॅब्लोंस्की एससी, रिव्हेंजर्स एससी अाणि सॅव्हियो एससी, अंधेरी हे क्लब या स्पर्धेत पुरुषांमध्ये एकमेकांशी भिडणार अाहेत.


महिलांमध्ये अाठ संघांचा समावेश

महिला गटात सेंट्रल रेल्वे तसेच वेस्टर्न रेल्वे यांनी अापला सहभाग निश्चित केला असून तब्बल अाठ संघ सहभागी होणार अाहेत. वरिष्ठ पुरुषांच्या गटात चार संघ खेळणार अाहेत. प्रत्येक गटातील विजेत्या अाणि उपविजेत्या संघांना रोख पारितोषिके अाणि चषक देऊन गौरविण्यात येणार अाहे.


हेही वाचा -

वांद्र्यातून घडणार हाॅकीपटू, 'फादर डाॅनली अॅस्ट्रो पार्क'चं अनावरण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा