Advertisement

वांद्र्यातून घडणार हाॅकीपटू, 'फादर डाॅनली अॅस्ट्रो पार्क'चं अनावरण


वांद्र्यातून घडणार हाॅकीपटू, 'फादर डाॅनली अॅस्ट्रो पार्क'चं अनावरण
SHARES

वांद्रे येथील लोकप्रिय असलेल्या सेंट स्टॅनिस्लाॅस हायस्कूलनं शिक्षणाबरोबरच हाॅकीपटू घडविण्याचा वसा घेतला अाहे. या शाळेनं अातापर्यंत अनेक दिग्गज हाॅकीपटू देशाला दिले असून यापुढेही वांद्रे येथून हाॅकीपटू घडविण्यासाठी शाळेनं कंबर कसली अाहे. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी शाळेतर्फे सेंट स्टॅनिस्लाॅस स्पोर्टस काॅम्प्लेक्स इथं अांतरराष्ट्रीय दर्जाचं अाणि अांतरराष्ट्रीय हाॅकी महासंघाची मान्यता असलेल्या 'फादर डाॅनली अॅस्ट्रो पार्क'चं अनावरण रविवारी करण्यात आलं.


याअाधीच्या अामच्या अांतरराष्ट्रीय खेळाडूंइतकीच गुणवत्ता सेंट स्टॅनिस्लाॅसच्या अात्ताच्या विद्यार्थ्यांमध्ये अाहे. त्यामुळे त्यांच्यासह अांतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा उभारण्याची गरज होती. त्यामुळे अाता अॅस्ट्रो पार्कचं अनावरण करताना अाम्हाला अानंद होत अाहे.
- फादर फ्रेझर




अांतरशालेय प्रदर्शनीय स्पर्धेचं अायोजन

या निमित्तानं वांद्रे येथील शाळांमधील मुला-मुलींसाठी प्रदर्शनीय स्पर्धेचं अायोजन करण्यात अालं होतं. या स्पर्धेत ड्युरेलो काॅन्व्हेंट हायस्कूल, सेंट जोसेफ हायस्कूल, माउंट मेरी काॅन्व्हेंट हायस्कूल, सेंट स्टॅनिस्लाॅस हायस्कूल, सेंट अँड्र्यूज हायस्कूल, सेंट तेरेसा हायस्कूल अाणि सेंट अॅलाॅयसिस हायस्कूल यांसारख्या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.




अाॅलिम्पियन्सची निवड समिती

या शाळेतून दर्जेदार हाॅकीपटू घडविण्यासाठी अाॅलिम्पियन हाॅकीपटूंचा सहभाग असलेली निवड समिती शाळेच्या व्यवस्थापनाने नियुक्त केली अाहे. या निवड समितीत अर्जुन पुरस्कार विजेते जोकिम कार्व्हालो, विरेन रस्क्विन्हा अाणि मार्सेलियस गोम्स या अाॅलिम्पियन्सचा समावेश अाहे. अनावरणाप्रसंगी स्टार खेळाडूंचा सहभाग असलेल्या प्रदर्शनीय सामन्याचे अायोजनही करण्यात अालं होतं. यात विरेन रस्क्विन्हा, धनराज पिल्ले, मार्सेलियस गोम्स, एड्रियन डिसूझा, राहुल सिंग, देविंदर वाल्मिकी, एडगर मस्कारेन्हास अाणि रजत शर्मा यांसारख्या दिग्गज हाॅकीपटूंनी भाग घेतला होता.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा