रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथाॅनची समग्र माहिती हवीय? मग हे वाचा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसटाटा मुंबई मॅरेथाॅनचं १५ वं पर्व रविवार २१ जानेवारी रोजी रंगणार अाहे. एव्हाना, मॅरेथाॅनच्या निमित्तानं काहींनी अनेक दिवसांपूर्वी अापल्या फिटनेसला सुरुवात केली असेल. या मॅरेथाॅन शर्यतीत धावण्यासाठी अनेकांची तयारी पूर्ण झाली असेल. मॅरेथाॅनपटूंना धावण्याचा सुंदर अनुभव देण्यासाठी मुंबईही सज्ज झाली अाहे. पण मुंबई मॅरेथाॅनचा मार्ग कसा असेल, धावपटूंसाठी कोणकोणत्या सुविधा असतील, कोणती शर्यत किती वाजता सुरू होईल, याची माहिती हवी असेल तर पुढील माहिती तुमच्यासाठी फारच उपयुक्त ठरेल.

अर्ध मॅरेथाॅनसाठी खास बसेस

वरळी डेअरी इथून सुरू होणाऱ्या अर्धमॅरेथाॅनमधील स्पर्धकांसाठी शर्यतीच्या ठिकाणी जाण्यासाठी मोफत विशेष बसची सुविधा करण्यात अाली अाहे. सकाळी ३.३० वाजल्यापासून ५.१५ वाजेपर्यंत ५५ बसेस उपलब्ध असतील. मध्य रेल्वेने येणाऱ्या धावपटूंसाठी करी रोड स्थानकातून २० बसेस सुटतील. पश्चिम रेल्वेने येणाऱ्या अॅथलिट्ससाठी महालक्ष्मी स्थानकातून २० बसेस सोडण्यात येतील.

शर्यतींना सुरुवात कधी होईल

शर्यत प्रकार

वेळ

सुरुवात कुठून

संपणार कुठे

पूर्ण मॅरेथाॅन (हौशी धावपटूंसाठी)

सकाळी ५.४० वाजता

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

पूर्ण मॅरेथाॅन (एलिट धावपटूंसाठी)

सकाळी ७.१० वाजता

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

अर्धमॅरेथाॅन (२१.०९७ किमी)

सकाळी ५.४० वाजता

वरळी डेअरी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

१० किमी रन

सकाळी ६.१० वाजता

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

सिनिअर सिटिझन (४.३ किमी)

सकाळी ७.२५ वाजता

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

मेट्रो सिनेमासमोर

अपंग रन (१.५ किमी)

सकाळी ७.४५ वाजता

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

एम. जी. रोड

ड्रीम रन (६ किमी)

सकाळी ८.२० वाजता

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

मेट्रो सिनेमासमोर

    

अाणखी काय सुविधा

१.५ लाख लिटर पाणी

वाॅटर स्टेशन्स - २७

मेडिकल स्टेशन्स -१२

नेस्टले रिफ्रेश झोन - ११

कुल स्पंज स्टेशन्स - ११

टाॅयलेट - ३४३

अॅम्ब्युलन्स - ११

डाॅक्टर तैनात - ५००

सुरक्षारक्षक - १६००

स्वयंसेवक - १४००

पोलिसांची फौज - ९०००

२ बेस कॅम्प - (अाझाद मैदान गेट क्र. ३ अाणि सीएसएमटी स्थानकासमोर गेट क्र. १)


हेही वाचा - 

मॅरेथॉनमध्ये सहभागी होताय? मग हे वाचाच!

मुंबई मॅरेथाॅन पूर्ण करणाऱ्याला मिळणार 'इन्स्पिरेशन मेडल'


पुढील बातमी
इतर बातम्या