Advertisement

मॅरेथॉनमध्ये सहभागी होताय? मग हे वाचाच!

मॅरेथॉनमध्ये धावण्याआधी एकदा तरी थेरेपिस्टचा सल्ला घ्या. कारण, बऱ्याचदा अचानक केलेल्या धावपळीची आपल्या शरीराला सवय नसते. त्यामुळे, आपल्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.

मॅरेथॉनमध्ये सहभागी होताय? मग हे वाचाच!
SHARES

नेहमीप्रमाणे यंदाही मुंबईकर मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी सज्ज झाले आहेत. येत्या २१ जानेवारीला मुंबईमध्ये मॅरेथॉन आहे. पण, या मॅरेथॉनमध्ये धावण्याआधी एकदा तरी थेरेपिस्टचा सल्ला घ्या. कारण, बऱ्याचदा अचानक केलेल्या धावपळीची आपल्या शरीराला सवय नसते. त्यामुळे, आपल्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.


६ महिने आधीच प्रॅक्टिस सुरु करा

जर खरंच, मॅरेथॉनमध्ये धावण्याची इच्छा असेल, तर ६ महिने आधीपासूनच धावण्याची प्रॅक्टिस करायला हवी. पण, त्यामुळेही अनेकदा अचानक धावल्यामुळे तुमच्या शरीरातील काही भागांना वेदना किंवा दुखणी होऊ शकतात. हे स्नायूंचं दुखणं ३ दिवसांपेक्षा जास्त असेल, तर फिजिओथेरेपिस्ट किंवा डॉक्टरांना लगेच दाखवा.



मॅरेथॉनमध्ये याआधी कधीही धावले नसाल, तर ६ महिने आधीपासूनच व्यायाम आणि पोहण्याचा सराव करा. नेहमी पाय, पाठ, गुडघा आणि पोटाचे, स्नायू यांना स्ट्रेच करण्यावर भर द्या.


अचानक धावू नका

याविषयी अधिक माहिती देताना नाइटिंगेल्स होम हेल्थ केअरच्या फिजिओथेरेपिस्ट डॉ. विजया बास्कर सांगतात, की अचानक धावण्याचा कधीच प्रयत्न करु नका. ज्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात धाप लागण्याची शक्यता आहे. मॅरेथॉनसाठी धावणार असाल, तर एक प्रशिक्षण वेळापत्रक तयार करुन घ्या. ज्यात लांब अंतर धावणं, कोअर व्यायाम आणि दर तिसऱ्या दिवशी आराम असं हे वेळापत्रक असावं. अशाच पद्धतीने एक-एक दिवस तुमच्या शरीराची क्षमता वाढवा.



या गोष्टी आवश्यक

 वजन आणि टिकाव धरण्याचं प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने घ्या
 मॅरेथॉनसाठी योग्य शूजचा वापर करा
 प्रशिक्षणात व्यायाम आणि विश्रांती हे दोन्ही घटक महत्त्वाचे
 महत्त्वाचे स्नायू (पोट, श्रोणीभाग आणि पाठ) स्ट्रेचिंग आणि बळकटी येणं महत्त्वाचं


ह्रदयाचे आजार असणाऱ्यांनी ही काळजी घ्या

 स्वतःवर जास्त ताण घेऊ नका
 पुरेशी झोप घ्या
 योग्य आहार घ्या
 शरीरातील इलेक्ट्रोलाईटकडे सातत्याने लक्ष द्या
 रक्तदाब, ब्लड-शुगर, कोलेस्ट्रॉल यांची तपासणी करा



हेही वाचा

टाटा मुंबई मॅरेथॉनने तोडले सर्व रेकॉर्डस, स्पर्धेअाधीच २५ कोटींचा निधी जमा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा