Advertisement

टाटा मुंबई मॅरेथॉनने तोडले सर्व रेकॉर्डस, स्पर्धेअाधीच २५ कोटींचा निधी जमा


टाटा मुंबई मॅरेथॉनने तोडले सर्व रेकॉर्डस, स्पर्धेअाधीच २५ कोटींचा निधी जमा
SHARES

टाटा मुंबई मॅरेथाॅनद्वारे दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी जमा केला जातो, त्यानंतर हा निधी सामाजिक संस्थांना त्यांच्या कार्यासाठी दिला जातो. पण या वर्षी टाटा मुंबई मॅरेथाॅनने निधी जमवण्याबाबतचे सर्व रेकाॅर्डस मोडीत काढले असून स्पर्धेपूर्वीच तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात अाला अाहे. हा निधी देशभरातील वंचित मुलांचे शिक्षण, त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणे, त्यांना चांगल्या संधी मिळवून देणे आणि त्यांना चांगले वातावरण मिळवून देण्यासाठी वापरला जातो.


पहिल्या वर्षी १.४ कोटींचा निधी

२००४ मध्ये जेव्हा पहिल्यांदा मुंबई मॅरेथाॅन शर्यतीला सुरुवात झाली, त्यावेळी १.४ कोटी रुपयांचा निधी जमा झाला होता. अाता १५ व्या पर्वात ही रक्कम कैक पटींनी वाढली असून या वर्षी त्बल २५ कोटी रुपये जमा करण्यात अाले अाहेत. प्रत्येक वर्षी टाटा मुंबई मॅरेथॉनच्या चॅरिटी निधीमध्ये वाढ होत आहे. युनायटेड वे मुंबईसह आमची भागीदारी अतुल्य आहे आणि समाजासाठी काम करता येत असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असं प्रोकॅम इंटरनॅशनलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक विवेक सिंग यांनी सांगितले.


१५व्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये खूप वेगळ्या लोकांचा सहभाग आहे. यावेळी आमच्याकडे २३१ पेक्षा अधिक तरूण मुलांनी निधी उभारण्यासाठी आपली नावे नोंदविली आहेत. या आकड्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आजच्या तरूण पिढीला यातून त्यांचे व्यक्तिमत्व घडवता येत असून भविष्यात चांगला नेता बनण्याचा आत्मविश्वास मिळतो आहे.
- जयंती शुक्ला, सीईओ, युनायटेड वे मुंबई


तरुणांनी उभारला २० टक्के निधी

यंदा उभारलेल्या एकूण निधीमध्ये जवळपास २० टक्के निधी हा तरूण मुलांनी उभारला आहे. यामध्ये या मुलांनी खूपच चांगली कामगिरी केली आहे. सिद्धार्थ दत्त रोन्कॉन याने नर्गिस दत्त फाऊंडेशनकरिता साधारण १६.१ लाखांपेक्षा अधिक निधी जमविला. दिवाळीच्या वेळी बॉर्जेस होममध्ये गेल्यानंतर त्यांच्यासाठी घेऊन गेलेला खाऊ दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद अविस्मरणीय होता आणि त्यामधूनच निधी उभारण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचे सिद्धार्थने यावेळी सांगितले. १३ वर्षांच्या कबीर दिवाणजीने कन्सर्न इंडिया फाऊंडेशनसाठी १.६ लाख गोळा केले. याशिवाय अंबर डांगे, मीरा मेहता, निश्की वर्मा, इशा गुलाटी, आध्या शिवकुमार, आर्या पांचाळ, नंदिनी पेलुरी, वेंदात शाह यांनीही लाखो रुपयांचा निधी जमविला अाहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा