Advertisement

मुंबई मॅरेथाॅन पूर्ण करणाऱ्याला मिळणार 'इन्स्पिरेशन मेडल'


मुंबई मॅरेथाॅन पूर्ण करणाऱ्याला मिळणार 'इन्स्पिरेशन मेडल'
SHARES

अाशियातील सर्वात प्रतिष्ठेची मॅरेथाॅन स्पर्धा असा नावलौकिक मिळवणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथाॅन स्पर्धेत यंदा ४२ किमी.ची पूर्ण मॅरेथाॅन पार करणाऱ्यांना इन्स्पिरेशन मेडल मिळणार अाहे. या मेडलचं वैशिष्ट्य म्हणजे एकमेकांना जोडलेल्या दोन मेडलमध्ये चुंबक म्हणजेच मॅग्नेट बसवण्यात अाले अाहे. हे मेडलच या वर्षीचे अाकर्षण ठरणार अाहे.



या मेडलची वैशिष्ट्ये

मॅरेथाॅन स्पर्धांमध्ये दिलं जाणारं हे कल्पक असं मेडल अाहे. भारतात अाणि जगभरातील मॅरेथाॅन स्पर्धांमध्ये अशाप्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात अाला अाहे. या मेडलच्या दोन्ही बाजूला विजेतेपदाचे तसेच प्रेरणा अाणि कृतज्ञतेचे चिन्ह अाहे. अाता हेच मेडल धावपटूंना अापली शर्यत पूर्ण करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. हे मेडल दोन भागात विभागण्यात अाले असून पहिल्या भागात शर्यत पूर्ण केल्याचे अाणि दुसऱ्या भागात हे पदक मिळविण्यासाठी प्रेरणा दिल्याचे चिन्ह अाहे.


भारताची भिस्त टी. गोपी, सुधा सिंग यांच्यावर

मुंबई मॅरेथाॅनमध्ये ३० देशांचे धावपटू सहभागी होणार असले तरी अाशियाई मॅरेथाॅनचे विजेतेपद पटकावणारा टी. गोपी अाणि नितेंद्र सिंग रावत तसेच महिलांमध्ये अाशियाई अाणि राष्ट्रकुल स्पर्धेत स्टिपलचेस प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी सुधा सिंग यांच्यावर भारताची भिस्त असणार अाहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा