डब्ल्युडब्ल्युई चॅम्पियन 'जेबीएल' खेळला शिवाजी पार्कमध्ये फुटबाॅल

डब्ल्युडब्ल्युई चॅम्पियन जॉन ब्रॅडशॉ लेफिल्ड (जेबीएल) मंगळवारी 'मॅजिक बस' या सामाजिक संस्थेतील लहान मुलांशी संवाद साधण्यासाठी अमेरिकेहून मुंबईत आला होता. यावेळी लहानग्यांशी गप्पा मारण्यासोबतच 'जेबीएल'ने त्यांच्यासोबत शिवाजी पार्क मैदानात फुटबाॅलही खेळला.

समर्थ व्यायाम मंदिर, शिवाजी पार्क, दादर येथे सकाळी १०.३० वाजता 'जेबीएल' 'मॅजिक बस'च्या मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी आला. यावेळी त्याने लहानग्यांना रेसलिंग करियरबद्दल माहिती दिली. आयुष्यातील ध्येय गाठण्यासाठी आपण कशी मेहनत घेतली, याचा सारा तपशीलही त्याने दिला.

'जेबीएल'चा अनुभव ऐकताना सर्वच जण भारावून गेले होते. त्यानंतर 'जेबीएल'ने मुलांसोबत फुटबाॅल खेळून ताण हलका केला.

'मॅजिक बस' ही सामाजिक संस्था गरीब, बाल मजूर, बाल विवाह इ. प्रथांना बळी पडणाऱ्या मुलांना शिक्षण देते तसेच प्रसिद्ध कलाकार किंवा क्रीडा क्षेत्रातील व्यक्तीला निमंत्रीत करून लहान मुलांना प्रोत्साहित करण्याचा, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करते.


हेही वाचा -

मुंबईत डबेवाल्यांची फुटबॉल किक

'ट्रिपल एच'नं मुंबई इंडियन्सला दिला चॅम्पियनशीप बेल्ट


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

 

पुढील बातमी
इतर बातम्या